'फूल टू स्मार्ट' स्पर्धेला शाळांचा उत्फुर्त प्रतिसाद

मिलिंद संगई
बुधवार, 27 जून 2018

बारामती - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी फूल टू स्मार्ट या अभिनव स्पर्धेस बारामती शहरातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
येथील म.ए.सो. चे कै. ग.भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर.एन. आगरवाल टेक्निकल विद्यालय, धों. आ. सातव विद्यालय, श्री छत्रपती शाहू हायस्कूल, कवि मोरोपंत विद्यालय, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक, न्यू इंग्लिश मिडीयम, सीबीएसई विद्यालय, महात्मा गांधी बालक मंदीर, झैनुबिया इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांनी या स्पर्धेसाठी प्रतिसाद दिला. 

इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फूल टू स्मार्ट ही स्पर्धा आहे. 28 जून ते 25 ऑक्टोबर 2018 या कालावधीत सकाळमध्ये दैनंदिन स्वरुपात सामान्यज्ञान वाढविण्यासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. 

सोमवार ते शनिवार दररोज कूपन प्रसिध्द होणार असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर लिहून शंभर पैकी किमान 80 कूपन त्यांना दिल्या जाणा-या प्रवेशिकेमध्ये चिटकवायची आहेत. यात आठ मास्टर कूपन असून ही आठ कूपन प्रवेशिकेत चिटकविणे अनिवार्य आहे. या स्पर्धेसाठी एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके दिले जाणार असून बंपर बक्षीस म्हणून स्कूटी पेप गाडी विजेत्यास मिळणार आहे. या शिवाय गिअरची सायकल, टॅब, ट्रॅव्हल बॅग, घड्याळ, लिक्विड अँक्वा मॅजिक विथ बॅग अशी असंख्य बक्षीसे विजेत्यांना मिळणार आहेत. 

हमखास बक्षीस...
या स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला हमखास बक्षीस मिळणार असल्याने सर्व शाळातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Web Title: The excitement of the schools 'flower to smart' competition