मतदानाच्या संख्येत तफावतीने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

३१ पैकी २० प्रभागात मतांची संख्या जुळेना; आयोगाकडे दाद

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ३१  पैकी ११ प्रभागात एकूण मतांची संख्या समान असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड मधील २० प्रभागांच्या चारही गटांच्या एकूण मतदानाच्या संख्येत तफावत आढळली असून, निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी मुख्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी निवडणूक आयुक्‍तांना पाठवले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निवडणूक प्रक्रियेत एका मतदाराने एकावेळी चार मते दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. याचा अर्थ एखाद्या प्रभागात समजा ९८७ नागरिकांनी मतदान केले तर त्या प्रभागाच्या चारही गटातील एकूण मतांची संख्या प्रत्येक म्हणजे अ, ब, क, आणि ड गटासाठी ९८७  इतकीच  येणे आवश्‍यक आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक प्रभागांत एकूण पडलेल्या मतांची संख्या अ , ब, क आणि ड या चारही विभागात वेगळी आहे.

पिंपरीतील २० भागांत अशी तफावत आढळून आली असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड बरोबरच अन्य महापालिकांच्या बाबतीत घडली असण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

मतांमध्ये आढळून येणारी तफावत ही एका मतापासून ते सातशे मतांपर्यंत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समधील उणिवेमुळे अशी तफावत आढळून येत असल्यास निवडणूक आयोगाने सर्वच मतदान प्रक्रियेचा फेरविचार करण्याची आवश्‍यकता आहे. याखेरीज या प्रश्‍नासंदर्भात तातडीने खुलासा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी कुंभार यांनी केली आहे.

Web Title: The excitement of the variation in the number of voting