कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

येरवडा : कारागृह प्रशासन सर्जनशीलतेने राबवित असलेल्या कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याची परिणामकारकता चांगली असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या नियंत्रणाचे काम कमी होईल, अशी आशा पुणे शहराचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी व्यक्त केली. 

येरवडा : कारागृह प्रशासन सर्जनशीलतेने राबवित असलेल्या कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याची परिणामकारकता चांगली असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या नियंत्रणाचे काम कमी होईल, अशी आशा पुणे शहराचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी व्यक्त केली. 

रक्षाबंधननिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे उद्‌घाटन करताना डॉ. व्यंकटेशम्‌ बोलत होते. या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य शरद खटावकर, तुरुंगाधिकारी ज्ञानेश्‍वर खरात उपस्थित होते. 
डॉ. व्यंकटेशम्‌ म्हणाले, कारागृहातील कैदी तयार करीत असलेल्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली आहे. अतिशय कमी साधने व कमी मनुष्यबळ असताना चांगले काम करणे मोठे आव्हान असते. त्यामुळे कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तू गरजेप्रमाणे शहर पोलिस आयुक्तालय खरेदी करेल. 

साठे म्हणाल्या, कारागृहाची व कैद्यांची प्रतिमा सुधारणासाठी कारागृह प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे विविध उपक्रमांची सुरवात केली आहे. त्यापैकी कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र. या केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद असून, अवघ्या दोन ते तीन दिवसांत वस्तू संपतात. येथील हातमागाच्या कपड्यांना, लाकडी व लेदरच्या वस्तूंना चांगली मागणी आहे. 
कारागृह विक्री केंद्रात लोखंडी फ्लॉवर पॉट, ट्रॉली, बादल्या, शेगड्या, चप्पल स्टॅण्ड, लाकडी टेबल, खुर्च्या, पाट, देव्हारे, बैलगाडी तर हातमागावरील चादर, बेडशीट, कपडे ठेवण्यात आल्याची माहिती विक्री केंद्राचे दिलीप वासनिक यांनी सांगितले. 
 

Web Title: exhibition of product made by prisoners form yeravda jail