दुर्मीळ काडेपेट्यांचे प्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

पुणे : भारत, रशिया, जपान, जर्मनी व युरोपसह विविध देशांमधील तब्बल पाचशे जुन्या काडेपेट्या. यात नावाजलेल्या व्यक्ती, फळे, फुले, भाज्या, वाद्य, पेहराव आदी छापांच्या काडेपेट्यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या दालनातील आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. 

पुण्यात नेहमीच वेगवेगळी प्रदर्शने होतात. पण, त्यात प्रामुख्याने चित्र, छायाचित्र वा म्युलर प्रदर्शनांचा समावेश सर्वाधिक असतो. मात्र, पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत काडेपेटी म्हणजेच मॅचबॉक्‍सचे अनोखे प्रदर्शन पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. यातील बहुतेक काडेपेट्या 50 ते 80 वर्षांपूर्वीच्या आहेत. राजा रविवर्मा यांनी काढलेली चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही निवडक चित्रांचे छाप हे काडेपेट्यांवरही छापले होते. या प्रदर्शनात अशा तसेच, अन्य दुर्मीळ काडेपेट्याही आहेत. सोमवार वगळता सर्वांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी 1 जुलैपर्यंत विनाशुल्क सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. 
 
Web Title: exhibition of rare candles