आंबेगाव : महिला बचत गटांनी उत्पादित खाद्य पदार्थ, मसाले, कटलरी विक्री प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद

चैतन्य संस्था राजगुरुनगर (ता.खेड) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ मंचर (ता.आंबेगाव) व महिंद्रा अँड महिंद्रा प्रकल्पाअंतर्गत २७ स्टॉल धारक सहभागी झाले
exhibition selling food spices cutlery produced by women mahila bachat gat pune
exhibition selling food spices cutlery produced by women mahila bachat gat punesakal

मंचर :आंबेगाव तालुक्यातील २७ महिला बचत गटांनी उत्पादित केलेले खाद्य पदार्थ, मसाले, विविध धान्यांची पीठे, कटलरी, फळ व फुलांचे रोपे, माती व बांबूपासून तयार केलेल्या वस्तूचे विक्री प्रदर्शन मंचर येथे शरद पवार सभागृहात रविवारी (ता.२६) भरविण्यात आले होते. वस्तू खरेदीसाठी महिला व नागरिकांची झुंबड उडाली होती. चैतन्य संस्था राजगुरुनगर (ता.खेड) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ मंचर (ता.आंबेगाव) व महिंद्रा अँड महिंद्रा प्रकल्पाअंतर्गत २७ स्टॉल धारक सहभागी झाले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन चैतन्य संस्थेच्या विश्वस्त सुरेखा श्रोत्रिय,भागवतप्रसाद पंत यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागीय व्यवस्थापक अनंता मस्करे, कल्पना सुकाळे,ज्योती पवार, गंगा बुके, दिव्यांग संघटनेचे समीर टाव्हरे, मंचर, खेड, जुन्नर, आळेफाटा या भागातील संघ पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग मंगल धोत्रे (ड्रेस), अलका भोर (हुलग्याची शिंगोळी), मीरा चव्हाण (मासवाडी), रोहिणी चव्हाण (मातीपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू), सुवर्णा खानदेशे (फिनेल) संध्या हिंगे (तयार पीठे), वनिता बांगर (नानकेट), सीमा डोंगरे (तयार कोरडे पूरण), सायरा मण्यार (बांगड्या) आदी स्टॉल होते. अँड. सुनील बांगर, बाळासाहेब पवार, माधुरी जाधव, संध्या हिंगे यांची मनोगते झाली. जयश्री रोकडे यांनी सादर केलेल्या “मोबाईलचे वेड” पथनाट्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. मोहिनी बांगर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक छाया बांगर व अरुणा टाव्हरे यांनी आभार मानले.

“ग्रामीण भागातील महिलांनी हक्काचा रोजगार मिळण्यासाठी गृह उद्योग उभारावेत, उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी. म्हणून महिला बचत गटांनी विक्री प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.दिवाळीपूर्वी मंचरला प्रदर्शन भरविले जाईल.”

सुरेखा श्रोत्रिय, विश्वस्त चैतन्य संस्था राजगुरुनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com