विद्यमानांमध्ये रंगणार अटीतटीचा सामना

संतोष शाळिग्राम 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

दत्तनगर-कात्रज गावठाण या प्रभागात विद्यमान तीन नगरसेवकांत सामना रंगणार आहे. त्यात पूर्वीचे काँग्रेस पक्षाचे असलेले अभिजित कदम यांनी भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळविले. कात्रजमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे, शिवसेनेचे धनराज कोंढरे हे समोरासमोर आहेत. सर्वसाधारण महिला गटामध्ये कल्पना थोरवे या विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांना भाजपच्या सुनीता लिपाणे, राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सारिका फाटे यांच्याशी सामना करावा लागेल.

दत्तनगर-कात्रज गावठाण या प्रभागात विद्यमान तीन नगरसेवकांत सामना रंगणार आहे. त्यात पूर्वीचे काँग्रेस पक्षाचे असलेले अभिजित कदम यांनी भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळविले. कात्रजमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे, शिवसेनेचे धनराज कोंढरे हे समोरासमोर आहेत. सर्वसाधारण महिला गटामध्ये कल्पना थोरवे या विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांना भाजपच्या सुनीता लिपाणे, राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सारिका फाटे यांच्याशी सामना करावा लागेल. सर्वसाधारण महिलांमध्येच भाजपच्या स्वप्नाली जाधव, राष्ट्रवादीच्या अमृता बाबर, शिवसेनेच्या मंगल सोकांडे, मनसेच्या दीपाली काकडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या प्रभा कांबळे आणि अपक्ष उमेदवार असलेल्या अर्चना शहा यांच्यात रंगतदार लढत होईल. नागरिकांच्या मागास प्रवर्गात भाजपचे संदीप बेलदरे, राष्ट्रवादीचे युवराज बेलदरे, शिवसेनेचे राजेंद्र धोंडे, मनसेचे अमित बेलदरे, काँग्रेसचे भूषण रानभरे, बहुजन मुक्ती पार्टीचे निखिल जाधव आणि अपक्ष प्रदीप कांबळे आमनेसामने आहेत.

विद्यमान नगरसेवकांकडे प्रचारासाठी त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे भांडवल आहे; परंतु प्रभागांच्या फेररचनेमुळे त्यांनी विकासकामे केलेले भाग वेगळ्या प्रभागात सामावले आहेत आणि अन्य भाग त्यांच्या प्रभागाला जोडला गेला आहे. त्यामुळे हक्काचा मतदार काही प्रमाणात तुटण्याबरोबर नव्या मतदारांना नवी आश्‍वासने देऊन त्यांचा विश्‍वास मिळविण्याचे आव्हान कात्रजकरांपुढे आहे. गेल्या वेळी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना या पक्षांचे नगरसेवक होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिष्ठा पणाला लावून खाते उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना-मनसे अशी लढत या प्रभागात होईल. विद्यमान दोन नगरसेवक आणि एक माजी नगरसेवक समोरासमोर असल्याने ती लढत लक्षवेधी ठरेल. मनसेची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागली आहे.

Web Title: existing corporator fight