विद्यमानांसह माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची गर्दी 

विद्यमानांसह माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची गर्दी 

पाच विद्यमान नगरसेवक, चार माजी नगरसेवक, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज या प्रभागातून इच्छुक आहे. शिवसेनेचे नगरसेवक अशोक हरणावळ आणि भाजपच्या नगरसेविका स्मिता वस्ते यांच्या जुन्या प्रभागातील संपूर्ण भाग, तर भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव आणि भाजपच्याच नगरसेविका मनीषा घाटे यांच्या जुन्या प्रभागातील सुमारे 75 टक्‍क्‍यांहून अधिक भाग या नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विनायक हनमघर आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका मनीषा बोडके यांच्याही जुन्या प्रभागाचा बहुतांश भाग या प्रभागात आहे. 

नवी पेठ, लोकमान्यनगर, विजयानगर कॉलनी, नेहरू स्टेडिअम परिसर, सारसबाग परिसर, एसटी कॉलनी, पर्वती दर्शन, मित्रमंडळ, पर्वती गाव, लक्ष्मीनगर, महात्मा फुले वसाहत, आंबेडकर शाळा, दांडेकर पूल, सर्व्हे क्रमांक 133, साने गुरुजी स्मारक, स्नेहनगर, आंबिलओढा कॉलनी, दत्तवाडीचा काही भाग, सेनादत्त पेठ, राजेंद्रनगर कॉलनी, शास्त्री रस्ता, टिळक रस्त्याचा काही भाग या प्रभागात आहे. सुमारे 40 टक्के वस्ती भाग आणि 60 टक्के सोसायट्या या भागात आहेत. 

या प्रभागात अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गटातील महिला आणि सर्वसाधारण गट, असे आरक्षण आहे. प्रभागात भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. राष्ट्रवादीच्याही दोन नगरसेवकांचा बराचसा भाग नव्या प्रभागात आहे. भाजपच्या विद्यमान तीन नगरसेवकांबरोबरच माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, युवक आघाडीचे अध्यक्ष आदींनी येथून उमेदवारीसाठी दावा केला आहे. अलीकडील काळात संघटनात्मक बांधणीमुळे या प्रभागाबद्दल राष्ट्रवादीच्या अपेक्षा वाढल्या असून, त्याचे प्रतिबिंब इच्छुकांनी मागितलेल्या उमेदवारीत उमटत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षापासूनच या भागात जाणीवपूर्वक विस्तार केला आहे. शिवसेनाही ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर येथे आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पूर्वी या प्रभागातून कॉंग्रेसचे सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांना मानणारा मतदार येथे असल्याने कॉंग्रेसलाही येथे अनुकूल वातावरण असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. युती आणि आघाडी होणार का, यावरही येथील उमेदवारीची समीकरणे अवलंबून आहेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

इच्छुक 

- भाजप ः धनंजय जाधव, स्मिता वस्ते, मनीषा घाटे, बाळासाहेब किरवे, रमेश काळे, विनोद वस्ते, धीरज घाटे, रघू गौडा, दीपक पोटे, महेश लडकत, केदार मानकर, माधुरी मानकर, प्रशांत सुर्वे, प्राची सुर्वे, सरस्वती शेंडगे, संजय सुपेकर, सचिन चव्हाण, जयश्री जाधव, वीणा काळे. 

- राष्ट्रवादी ः विनायक हनमघर, श्‍याम मानकर, लक्ष्मीकांत खाबिया, विपूल म्हैसूरकर, स्वप्ना म्हैसूरकर, स्वप्नील सावंत, ऍड. घनश्‍याम खलाटे, अनिता कांबळे, जया फुलपगार, रीना शिंदे, कार्तिकी कांबळे, श्‍याम ढावरे, अमृता कांबळे, हरीश खर्डेकर, प्रशांत क्षीरसागर, राहुल भिगवनकर, सुनीत सागर, मनीषा गाडे, मनीषा कोलते, योगिता मेमाणे, सुषमा पाचंगे, सुप्रिया सावंत, रामदास गाडे, श्रीकांत मेमाणे, राजाभाऊ सावंत, अनिल जोरी, युवराज दिसले, समीर कोलते, संदीप दारवटकर, छबील पटेल. 

- कॉंग्रेस ः काका धर्मावत, सचिन आडेकर, विकास लांडगे, अमित बागूल, द. स. पोळेकर, सुधीर मुरूमकर, डॉ. शुभांगी काटकर, लक्ष्मी पवार, किरण गायकवाड, संतोष पाटोळे, दीपक ओव्हाळ. 

- शिवसेना ः अशोक हरणावळ, प्रसाद काकडे, दिलीप पोमण, कविता दोडके, गणेश घोलप, राजू झगडे, अमित पुणेकर. 

- मनसे ः जयराज लांडगे, शुभांगी सातपुते, गणेश सातपुते, राकेश क्षीरसागर, जयश्री पाथरकर, अभिमन्यू मैड, प्रमोद गरुड, राम सरोदे, उषा काळे, मुकुंद कानगुडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com