बारामतीत महाबळेश्वरची अनुभूती

मिलिंद संगई, बारामती
शनिवार, 29 डिसेंबर 2018

बारामती शहर : शहरात कालची रात्र सर्वाधिक थंड ठरली. बारामतीकरांनी आज महाबळेश्वरमध्ये वावरत असल्याचा अनुभव घेतला. गेल्या अनेक वर्षात इतकी थंडी पडली नव्हती ,असे काही नागरिकांनी सांगितले.
 
बारामती शहर : शहरात कालची रात्र सर्वाधिक थंड ठरली. बारामतीकरांनी आज महाबळेश्वरमध्ये वावरत असल्याचा अनुभव घेतला. गेल्या अनेक वर्षात इतकी थंडी पडली नव्हती ,असे काही नागरिकांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्रामध्ये आज सकाळी आठ वाजता 5.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आज सकाळी घराबाहेर लवकर पडलेल्या सर्वांना थंडीचा कडाका जाणवला. अनेकांचे हात गारठून गेले होते, तर थंडीच्या कडाक्याने घराबाहेर पडणे टाळले. स्वेटर, कानटोपी आणि जर्किन शिवाय घराबाहेर पडणे अशक्य बनल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन वैद्यकीय व्यावसायिकांनी केले आहे. आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: The experience of Mahabaleshwar in Baramati