Feel the Beat : कोरोना संकटात ड्युटी बजावणाऱ्या 'खाकी किंग'ची गौरवगाथा; वाचा सविस्तर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करावे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी, यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने "फिल द बीट" या सचित्र पुस्तकाची तयार करण्यात आले असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. 

पुणे : कोणाला प्रसूतीसाठी, काहींना अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, तर कोणाच्या काळजाच्या तुकड्याला एकत्र आणण्यासाठी पुणे पोलिसांनी धडपड केली. पुणे पोलिस प्रशासनाने अशाच चांगल्या कामाची दखल "फिल द बीट" या सचित्र पुस्तकाद्वारे घेऊन पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनो, आता 'स्वयं'चे कोर्स शिकता येणार मराठीत!

कोरोनामुळे एककिकडे लॉकडाऊन अधिक कडक सुरु होता. त्यातच एका मूकबधीर वधु पित्याचा बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांना फोन आला. त्यांच्या मुकबधीर मुलीचे औरंगाबादमधील एका मूकबधीर मुलाशी लग्न होणार आहे, परंतु लॉकडाऊनमुळे मुलाला पुण्यात येण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. घाडगे यांनी त्या मुलासाठी फक्त पास उपलब्ध करुन दिला नाही, तर घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण लग्न पार पाडले.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

ही काही एकच घटना नाही, या आणि अशा कित्येक घटनामध्ये पुणे पोलिस नागरीकांच्या मदतीला धावून गेले. केवळ अन्नदान, अन्नधान्याचे संच वाटून पोलिस शांत बसले नाहीत. वेळ प्रसंगी पोलिसांनी स्वत:च्या कुटुंबासाठीचा वेळही लोकांचे प्रश्न सोडविण्यात घालविला. ऊन, वारा, पावसाची तमा पोलिसांनी बाळगली नाही. अशा पद्धतीने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांच्या कामाची जाणीव पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांना होती. डॉ. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतूनच या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करावे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी, यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने "फिल द बीट" या सचित्र पुस्तकाची तयार करण्यात आले असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

Image may contain: text

काय आहे पुस्तकात
विविध पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यानी केलेल्या चांगल्या कामाच्या 25 घटनाचा समावेश या पुस्तकात केला आहे.त्यामध्ये "लग्नाची बेडी", "देवदूत", "खाकी किंग", "काळ आला होता, पण..", "मला माझी आई हवी आहे", "एक कहाणी पोतराजाची", "ईद साजरी होणारच" अशा घटना समाविष्ठ करण्यात आल्या आहेत. हे पुस्तक 68 पानांचे असून ते मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही वाचता येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे पोलिसांचे सर्वेक्षण
लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात पुणे पोलिसांनी एक सर्वेक्षण केले. त्यास सुमारे 22 हजार 791 हजार लोकांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी 83 टक्के पोलिसांनी पुणे पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. याचाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experience the work done by Pune City Police during the Corona Pandemic through the book Feel the Beat