अनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत, अनुभवी कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. विशेषत: महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास असलेल्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.  

पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. तीन शहर उपाध्यक्षांसह, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, कार्याध्यांच्या नावांची घोषणा केली. उपाध्यक्षपदावर नारायण गलांडे, शशिकांत तापकीर, आनंद तांबे यांना संधी मिळाली आहे. पर्वती मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नितीन कदम आणि कार्याध्यक्ष म्हणून दिलीप कांबळे यांच्याकडे दिली आहे. कसब्यासाठी विनायक हणमघर, गणेश नलावडे, तर कोथरूडमध्ये स्वप्नील दुधाणे, नितीन कळमकर यांची निवड केली आहे. शिवाजीनगरची जबाबदारी नीलेश निकम, राजेश सानेंकडे असेल. हडपसर मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नारायण लोणकर आणि कार्याध्यक्षपदी आबा कापरे यांना निवड झाली आहे. खडकवासल्यात काका चव्हाण आणि संतोष फरांदे यांना संधी मिळाली आहे. वडगाव शेरीत राजेंद्र खांदवे, रमेश आढाव यांची नेमणूक केली आहे. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात भोलासिंग अरोरा, फहीम शेख यांच्या नावांची घोषणा झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्षपद विजय डाकले, तर, ‘ओबीसी’ विभागाची जबाबदारी संतोष नांगरेंकडे दिली आहे.

Web Title: Experienced activist also have the opportunity of young people as well as opportunities NCP