पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी थ्रीडी झेब्रा पट्ट्यांचा प्रयोग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

थ्रीडी झेब्रा पट्ट्यांमुळे काय होणार ? 
- वाहनांची गती कमी होईल 
- वाहने झेब्रा पट्ट्यांच्या मागे थांबतील 
- पादचाऱ्यांना झेब्रा पट्ट्यांवरून रस्ता ओलांडणे सोपे जाईल 
- वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही 

पुणे - सिग्नलला लाल दिवा लागला की, वाहनचालक सर्रासपणे पादचाऱ्यांसाठी असलेल्या झेब्रा पट्ट्यांवरच आपली वाहने उभी करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करीत रस्ता ओलांडावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी वाहतूक शाखेने वाहनचालकांना झेब्रा पट्ट्यांच्या अगोदर थांबावे, यासाठी "थ्रीडी झेब्रा पट्ट्या' हा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. 

नागरिकांना रस्ता ओलांडणे सोयीचे जावे, वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंगवर थांबू नये यासाठी वाहतूक शाखेकडून "थ्रीडी झेब्रा पट्ट्या' हा प्रयोग राबविणार आहे. त्यादृष्टीने वाहतूक शाखेच्या येरवडा येथील कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर "थ्रीडी झेब्रा पट्ट्या' छापल्या आहेत. वाहनचालकांना सिग्नल लागल्यानंतर चौकामध्ये झेब्रा पट्ट्यांवर थ्रीडी प्रकारामुळे आयताकृती ठोकळे दिसून त्यांना पट्ट्यांच्या मागे वाहन थांबवावे लागणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

याविषयी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, ""पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा, यादृष्टीने थ्रीडी झेब्रा पट्ट्यांचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. शहरातील काही रस्त्यांवर हा प्रयोग केला जाईल.'' 

थ्रीडी झेब्रा पट्ट्यांमुळे काय होणार ? 
- वाहनांची गती कमी होईल 
- वाहने झेब्रा पट्ट्यांच्या मागे थांबतील 
- पादचाऱ्यांना झेब्रा पट्ट्यांवरून रस्ता ओलांडणे सोपे जाईल 
- वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiment with 3D zebra straps for pedestrian safety

टॅग्स