गुणवत्तेशी तडजोड नसल्याचे महामेट्रोकडून स्पष्टीकरण

गुणवत्तेशी तडजोड नसल्याचे महामेट्रोकडून स्पष्टीकरण

पुणे - महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पुणे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामात उच्च प्रतीच्या काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम उच्च दर्जाच्या मानकानुसार करण्यात येत असून, गुणवत्ता नियंत्रणासाठी अत्यंत सक्षम व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. कामात वापरण्यात येणाऱ्या काँक्रीटसाठी स्वतंत्र बॅंचिंग प्लांट उभारण्यात आल्याची माहिती महामेट्रोने पायलिंग मशिन कोसळल्याच्या पार्श्‍वभूमीवर दिली. 

कास्टिंग यार्ड आणि बॅंचिंग प्लांटमध्ये खडी, रेती, पाणी इत्यादी सामग्रीची तपासणी करण्याकरिता अनुभवी लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्लांटमधील सामग्रीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यानंतर काँक्रीट बनविण्यासाठी या सामग्रीचा उपयोग केला जातो. नमुन्यासाठी बनविलेल्या काँक्रीट ब्लॉकच्याही विविध चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्यांमध्ये त्याची गुणवत्ता तपासली जाते. महामेट्रो गुणवत्ता आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, या प्रकारच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. उच्च दर्जाचे अत्याधुनिक काँक्रीट तंत्रज्ञान वापरावर मेट्रोचा जोर आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com