Pune Blast : पुण्यात इलेक्ट्रिक दुकानात स्फोट; एटीएसला संशय आल्याने तपास सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Blast

Pune Blast : पुण्यात इलेक्ट्रिक दुकानात स्फोट; एटीएसला संशय आल्याने तपास सुरु

पुणेः पुण्यात सहकारनगरमध्ये सोमवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात स्फोट झाले आहे. या स्फोटाचा एटीएसने तपास सुरू केला आहे.

टीव्हीचा स्फ़ोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता. मात्र स्फोटात झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू झाला आहे. सोमवारी पहाटे तीन वाजता हा स्फ़ोट झाला होता.

सहकार नगरमध्ये होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व आणि मोबाईल शॉपी अशी दुकाने आहेत. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तू होत्या.

याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पूर्ण जळाली होती.

भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामधे एक इसम दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते. या प्रकरणाचा तपास आता एटीएस करीत आहे.

टॅग्स :Pune Newsblast