धर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठीच 'ती' स्फोटके : कसबे

सचिन बडे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे  : 'काही दिवसांपुर्वी पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा वैयक्तिक कुणाला जखमी करण्यासाठी नसून तो धर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठी ठेवला होता. यापुढे धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत आलं तर, त्या सरकारला नियंत्रणात ठेवण्यासाठीचं ते नियोजन होतं.' असे मत ज्येष्ठ विचारवंत, संशोधक रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केलं. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त दाभोलकरांना अभिवादन करताना ते बोलत होते. 

कसबे म्हणाले, या स्फोटकाचा वापर करुन देशातील दोन विचारसारणी, धर्म यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशामध्ये सध्या अराजकतेचे वातवरण निर्माण केले जात आहे. याचा फायदा निवडणूका जिंकण्यासाठी केला जातो. पण या अराजकतेचा समाजावर होणारा परिणाम हा मोठा आणि दीर्घकालीन असतो. 

समाजातील सर्व अडचणीचे मुळ हे धर्मात आहे, त्यामुळे धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे. तुकाराम महारारज हे पहिले संत होते. ज्यांनी सांगितलं की देव हा मानवाने निर्माण केलेला आहे. तसेच धर्म ही मानवनिर्मित आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माची चिकित्सा होणे गरजेचे असते. डॉ. दाभोलकर यांनी देखील धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे धर्माची कठोर चिकित्सा ही त्यांनी खरी श्रद्धांजली ठरेल. 

ते पुढे म्हणाले, दाभोलकर, पानसरे, कुलबर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या खुनातील आरोपींचा एकमेकांशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. यासर्व आरोपींच्यामागे कट्टर हिंदूत्ववादी संस्थाचा हात असल्याचे समोर येते आहे. यातून कट्टर धर्मवादाची होणारी हार स्पष्ट दिसत आहे. कारण कोणत्याही व्यक्तीची हत्या तेंव्हाच केली जाते. जेंव्हा त्या व्यक्तीला विचाराने हरवण्यात अपयश येते. धर्माच्या नावाने हत्या करण्याऱ्याला हे तरी माहित आहे का? की कोणताही धर्म हा हिंसेला अनुमती देत नाही. तरी अशा लोकांच्या समर्थनार्थ समाज रस्त्यावर उतरणे हे समाज अधोगतीकडे जाण्याचे लक्षण आहे.

Web Title: 'that' explosives are to attack secular ideology said kasbe