द्रुतगती मार्गावर पुन्हा मेगा ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत ते खंडाळादरम्यान धोकादायक दरडी पाडण्याच्या कामामुळे पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. 

१८ एप्रिल ते ६ मे या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी सव्वातीन या वेळेत पंधरा-पंधरा मिनिटांसाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे.

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत ते खंडाळादरम्यान धोकादायक दरडी पाडण्याच्या कामामुळे पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. 

१८ एप्रिल ते ६ मे या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी सव्वातीन या वेळेत पंधरा-पंधरा मिनिटांसाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे. 

रस्ते विकास महामंडळाकडून गुरुवारपासून सकाळी दहाच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ दरडी पाडण्याच्या कामास सुरवात करण्यात आली. या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पंधरा मिनिटांसाठी थांबविण्यात आली होती. टप्प्याटप्यात हे काम हाती घेण्यात येत असल्याने वाहतुकीवर काहीसा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. सकाळी १० ते १०.१५, ११ ते ११.१५, १२ ते १२.१५, २ ते २.१५, ३ ते ३.१५ या कालावधीत वाहतूक थांबविण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १९) कामशेत बोगद्याजवळ मुंबई लेनवर व सोमवारी (ता. २२) पुणे लेनवर काम करण्यात येणार आहे. २३ एप्रिल ते २९ एप्रिलदरम्यान कुसगाव बु. येथील सिंहगड महाविद्यालयाजवळ पुणे आणि मुंबई लेनवर धोकादायक दरडी पाडण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. २ आणि ३ मे रोजी लोणाववळ्याजवळ, तर ६ मे रोजी अमृतांजन पुलाजवळ मुंबई लेनवर दरडी पाडण्यात येणार आहेत. सार्वजनिक सुट्या, शनिवारी व रविवारी वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी ब्लॉक घेतला जाणार नाही, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

Web Title: Express Way Mega Block