अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

बारावीच्या फेरपरीक्षा उत्तीर्णांना मिळणार संधी 
पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्र, वास्तुकला आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढीस परवानगी दिली. यामुळे पूरग्रस्त भागातील; तसेच बारावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. 

अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी शेवटची मुदत 14 ऑगस्टपर्यंत होती. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया होणार नसल्याचे यापूर्वीच प्रसिद्ध केले होते. मात्र, अजूनही काही विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी जागाही तितक्‍याच रिक्‍त आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ही मुदतवाढ मिळाली. दरम्यान, आता संस्थांना ता.31पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे राज्य सीईटी सेल प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष महाजन यांनी परिपत्रकात म्हटले आहे. 

बारावी फेरपरीक्षेचा तीन दिवसांपूर्वी निकाल राज्य बोर्डाने जाहीर केला. त्यात राज्यातून 30 हजार 438 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेतून उत्तीर्ण होऊन कुठेही प्रवेशाची शक्‍यता नव्हती. या सर्व विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्याच्या पूरग्रस्त भागात जे विद्यार्थी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकले नाहीत; तसेच बारावीच्या फेरपरीक्षेत जे उत्तीर्ण झाले त्यांनी ऑनलाइन अर्ज भरून 31 पूर्वी सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून निश्‍चितीदेखील करायची आहे. त्यानंतर संस्थास्तरावर जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टनंतर प्रवेश मिळणार नाही, असे डॉ. महाजन यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extended engineering admission