"आरटीई' प्रवेशासाठी मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) 25 टक्के जागांवर विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन 10 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. यापूर्वी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 4 एप्रिल होती. राज्यभरात निम्म्या जागा रिक्त राहिल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी पहिली सोडत 12 आणि 13 मार्च रोजी काढण्यात आली होती. 

राज्यात आतापर्यंत 31 हजार जागांवर प्रवेश झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 16 हजार 422 राखीव जागा आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीत दहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी निम्म्या जागा रिक्त असल्याने प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्याची मागणी येत होती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले. 

शिक्षण विभागाने प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीमध्ये शाळा मिळाली असतानाही निवासाच्या अंतरावरून प्रवेश नाकारण्यात येत होते. या पालकांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आले आहेत, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. 

पुढील वर्षी अचूक अंतर 
प्रवेशाच्या ऑनलाइन अर्जात पत्ता टाकताना पालक गुगल मॅपवरील बलून शाळेच्या पत्त्याजवळ आणून ठेवतात. त्यामुळे घराचे प्रत्यक्ष अंतर मोजले, तर ते शाळेपासून एक किलोमीटरपेक्षा अधिक भरते. त्यामुळे प्रवेश नाकारला जातो. हे प्रकार घडू नयेत म्हणून पुढील वर्षी संगणक प्रणालीत बदल केला जाणार आहे. पालकांना त्यांचा निवासाचा पत्ता टाकल्यानंतर त्याच ठिकाणी बलून आपोआप जाईल, तो पुन्हा हलविता येणार नाही, असे शरद गोसावी यांनी सांगितले. 

राज्यातील जागा : 58 हजार 
झालेले प्रवेश : 31 हजार 

पुणे जिल्ह्यातील जागा : 16,422 
झालेले प्रवेश : 5500 

Web Title: Extension for RTE