"सीटीईटी' अर्जासाठी 12 मार्चपर्यंत मुदतवाढ 

"सीटीईटी' अर्जासाठी 12 मार्चपर्यंत मुदतवाढ 

पुणे - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी असणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे अर्ज अपलोड होत नाही, अशी तक्रार उमेदवार करत आहेत. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 12 मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. 

केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून भरती होण्यापूर्वी सीटीईटी देणे बंधनकारक आहे. यावर्षी ही परीक्षा सात जुलैला होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पाच फेब्रुवारीपासून ते पाच मार्चपर्यंत मुदत दिली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी असणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. मात्र, दरम्यान सीबीएसईने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उमेदवारांना 12 मार्चपर्यंत अर्ज करता येणार असून परीक्षेचे शुल्क 15 मार्च दुपारी साडेतीन वाजेपर्यंत भरता येणार आहे. 

केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षक होण्यासाठी देशपातळीवर ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. यावर्षी ही परीक्षा 20 भाषांमध्ये देशातील 97 शहरातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. राज्यात पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये ही परीक्षा होईल. 

गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रयत्न करूनही अर्ज "सेव्ह' होत नाही. परिणामी परीक्षेचा अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे उमेदवार चिंता व्यक्त करत आहेत. 

गेल्या तीन-चार दिवसांपासून संबंधित संकेतस्थळावर परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहोत. परीक्षेचा अर्ज भरला जात आहे. परंतु तो "सेव्ह' करायला गेल्यास सर्व्हर डाऊन होतो किंवा पुढे कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचे दिसते. या तांत्रिक अडचणीला एक दिवस नव्हे, तर तीन-चार दिवसांपासून सातत्याने सामोरे जावे लागत आहे. 
- सारिका घारे, उमेदवार 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com