#MedicalAdmissions : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ मे पर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सोमवारी रात्री उशिरा जाहीर केले.

पुणे : दंत वैद्यक आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने 25 मे पर्यंतची मुदत वाढ दिली आहे.

या प्रवेश प्रक्रियेला मराठा आरक्षण (एसईबीसी) लागू करण्यात यावे, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, यंदा मराठा आरक्षण लागू करता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने देखील हा आदेश कायम ठेवला आहे. 

दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सोमवारी रात्री उशिरा जाहीर केले. त्याप्रमाणे राज्य सामाईक प्रवेश कक्षाने ही मुदतवाढ दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension till May 25 for admission to a medical post graduate course