तडीपार आदेशाचे उल्लंघन करत गुन्हे करणाऱ्यांना 'एक्स्ट्रा'ची बसणार धडकी; वाचा सविस्तर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

गुन्हेगारी कारवायामुळे शहरातुन हद्दपार केल्यानंतरही मागील दिड वर्षात हद्दपार आदेशाचा भंग करीत गुन्हेगारांनी 102 गुन्हे केले. त्याची गांभीर्याने दखल घेत पुणे पोलिसांनी अशा हद्दपार गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी "एक्सटर्ननीस मॉनिटरिंग अँड ट्रैकिंग सिस्टिम" (एक्स्ट्रा) मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे.

पुणे - गुन्हेगारी कारवायामुळे शहरातुन हद्दपार केल्यानंतरही मागील दिड वर्षात हद्दपार आदेशाचा भंग करीत गुन्हेगारांनी 102 गुन्हे केले. त्याची गांभीर्याने दखल घेत पुणे पोलिसांनी अशा हद्दपार गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी "एक्सटर्ननीस मॉनिटरिंग अँड ट्रैकिंग सिस्टिम" (एक्स्ट्रा) मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता हद्दपार गुन्हेगारांना "एक्स्ट्रा"ची चांगलीच धडकी भरणार आहे. विशेषत: आणखी काही गुन्हेगारांना लवकरच हद्दपार केले जाणार असून त्यांच्यावर ही "एक्स्ट्रा"चे लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरामध्ये विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांकडुन काही वर्षासाठी शहर व जिल्ह्याबाहेर हद्दपार केले जाते. त्यामुळे संबंधीत परीसरात शांतता निर्माण होण्यास मदत होते. असे असतानाही संबंधीत गुन्हेगार हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करीत शहरात गंभीर गुन्हे करीत असल्याचे मागील दिड वर्षात पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामध्ये खुन, दरोडा, बेकायदा शस्त्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्याकडुन घडत होते. 

कोरोनानंतर रोजगार संधी शोधताना 'अशी' असावी मानसिकता: सांगताहेत फायनास अॅडवायझर

कोरोनामुळे शहरात लागू केलेले संचार मनाई आदेश काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर शहरात खुन, खुनाचा प्रयत्न व अन्य गुन्हे घडले. त्याचवेळी हद्दपारी आदेशाचा भंग करुन काहीजणाचा शहरात वावर वाढल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर संबंधीत गुन्हेगारांवर वचक बसावा, गुन्हेगारांनी आदेशाचे उल्लंघन करु नये, यासाठी "एक्स्ट्रा" या ॲपची निर्मिती करण्यात आली. 

पुण्यात यंदा गणेशोत्सव होणार की नाही?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

...असे करेल "एक्स्ट्रा" आपले काम !
पुणे पोलिसांनी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांच्या मोबाईलमध्ये "एक्स्ट्रा" ॲप डाऊनलोड करण्यात येणार आहे. हा मोबाईल गुन्हेगारासमवेतच असणार आहे. गुन्हेगाराने त्याच्या हद्दपार ठिकाण ओलांडताच पुणे पोलिसांना त्याबाबत सतर्कतेचा संदेश मिळणार आहे.

- कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!

2019 व 2020 हद्दपार आदेशाचा भंग करुन गुन्हेगाराने केलेले गुन्हे  - 102
- खुन - 1
- खुनाचा प्रयत्न - 8
- घातक शस्त्राद्वारे गंभीर मारहाण  - 5
- बेकायदा शस्त्र बाळगणे - 16
- अंमली पदार्थ बाळगणे - 2
- हद्दपार आदेशाचा भंग करणे - 69
- अन्य - 1 

'शहरातुन हद्दपार केलेले गुन्हेगार शहरात घडलेल्या गंभीर गुन्हमध्ये सहभागी करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते. 2019 व 2020 प्रमाणे हद्दपार गुन्हेगारांकडून खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे व अंमली पदार्थ बाळगणे असे 102 गुन्हे केले होते. त्यामुळेच त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम "एक्स्ट्रा"द्वारे केले जाणार आहे. त्यामुळे हद्दपारीचे उल्लंघन व त्यातून होणारे गंभीर गुन्हे रोखता येणार आहेत.'
- बच्चन सिंग,पोलिस उपायुक्त (गुन्हे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra threat to criminals violating deportation order Read more