पुणे : सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे : विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिला. 

पुणे : विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिला. 

अमोल संपत वाखारे (वय 27, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे तडीपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाखारे विरुद्ध कोरेगाव पार्क व बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गंभीर दुखापत करणे, जखमी करणे, मारहाण, शिवीगाळ, सामाईक इरादा, दुखापत पोचविण्याच्या उद्देशाने अंगावर धावुन जाणे, दंगा करणे, बेकायदेशीर जमावात सामिल होणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

संबंधीत आरोपीस शहर व जिल्ह्यातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव कोरेगाव पार्क पोलिसांनी पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार, सिंग यांनी वाखारे यास एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले. 
 
Web Title: extradite a criminal for a year from pune City and district