समाजाच्या सहकार्यानेच नेत्रदान चळवळ पुढे जाईल - डॅा. भट्टड

रमेश वत्रे
बुधवार, 13 जून 2018

केडगाव - नेत्रदानाच्या कामात डॅाक्टरांची भूमिका छोटी असते. मयत व्यक्तिचे नेत्रदान होईल की नाही हे सर्वस्वी रूग्णाचे नातेवाईक व मित्र मंडळी यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे समाजाच्या सहकार्यानेच नेत्रदानाची चळवळ पुढे जाऊ शकते. असे मत नेत्रतज्ज्ञ डॅा. प्रेमकुमार भट्टड यांनी व्यक्त केले. 

केडगाव - नेत्रदानाच्या कामात डॅाक्टरांची भूमिका छोटी असते. मयत व्यक्तिचे नेत्रदान होईल की नाही हे सर्वस्वी रूग्णाचे नातेवाईक व मित्र मंडळी यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे समाजाच्या सहकार्यानेच नेत्रदानाची चळवळ पुढे जाऊ शकते. असे मत नेत्रतज्ज्ञ डॅा. प्रेमकुमार भट्टड यांनी व्यक्त केले. 

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त एक मित्र एक वृक्ष या संघटनेने विठ्ठलवाडी (ता.दौंड,जि.पुणे ) येथे नेत्रदान केलेल्या दिवंगतांच्या नातेवाईकांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी डॅा. भट्टड नेत्रदानाचे महत्व सांगताना बोलत होते. यावेळी भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, वरवंडचे सरपंच संतोष कचरे, संतोष शिलोत, अजय गवळी, डी.डी.बारवकर, मुख्याध्यापक संदीप ढगे, युवराज घोगरे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. एक मित्र एक वृक्ष ही संकल्पना राबवून नेत्रदानाचा संकल्प करण्यात आला. कला शिक्षक सुभाष फासगे यांनी नेत्रदान जागृतीवर रांगोळी रेखाटली होती. डॉ.प्रेमकुमार भट्टड यांनी आतापर्यंत बारामती, श्रीगोंदा, दौंड तालुक्यातील 200 डोळे नेत्रपेढीकडे पाठविले आहेत. डॅा.भट्टड हे रात्री अपरात्री नेत्रदानाच्या कामासाठी धाऊन जात असतात. या कार्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  

यावेळी विठ्ठलवाडीतील ९७ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. तसेच मृत्यूनंतर नेत्रदान झालेल्या मंगलबाई मुथ्था, इमरतबाई गांधी, मणीलालजी पोखऱणा, दीपकलाल चोपडा, बाबूराव वत्रे, मीनल पितळे, कुसुमबाई शेलोत, कुसुमबाई सावज, किसनराव निंबाळकर, कांतीलाल पितळे यांचा नातेवाईकांकडे प्रशस्तीपत्रक देऊन मरणोत्तर गौरव करण्यात आला. एक मित्र एक वृक्ष या गृपचे अध्यक्ष प्रशांत मुथ्था यांनी प्रास्ताविक केले. डॉ.श्रीवल्लभ अवचट यांनी आयुर्वेदिक व देशी वृक्षांचे महत्व सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलवाडी शाळेत विविध दुर्मिळ व देशी वृक्षरोपण केले. 

दौड तालुक्यात १२ वी सायन्स ला प्रथम आलेली निकिता जालिंदर कांबळे व १० वी मधून प्रथम आलेली नेहा जालिंदर कांबळे व देऊळगावगाडा माध्यमिक विद्यालयामध्ये १० वी मध्ये उत्कृष्ठ यश मिळवलेले प्रतिक्षा बारवकर, पवन बारवकर, प्रतिक बारवकर, किरणकुमार होले, ॠषिकेश बारवकर यांना गौरविण्यात आले. 

Web Title: Eye donation movement will go forward with the help of society - DA Bhattad