जिरायती भागाचे पावसासाठी आभाळाकडे डोळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे परिसरातील गावात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. 

उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे परिसरातील गावात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. 

जिरायती भागातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, जराडवाडी, देऊळगाव रसाळ आदी परिसरात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने पाणीटंचाई आहे. खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई व चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. या भागातील खरीप हंगामात बाजरी, मूग, उडीद, गुलछडी, चारा पिके आदी पिके घेत असतात. मात्र, जून महिना संपत आला, तरी देखील दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतात पेरणी पूर्व मशागत करून ठेवली आहे. दररोज ढग येतात आणि सोसाट्याचा वारा वाहून ढग जातात. असेच गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. 

दरम्यान, शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन दरम्यानच्या काळात या भागातील गावात सोडण्यात आले होते. त्यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाई कमी झाली असली, तरी बहुतांशी भागात आजही पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी पाझर तलावात सोडून घेतले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

Web Title: Eyes in the sky for the rain