चित्रपटांच्या प्रमोशनसाठी फेसबुक ग्रुपचा फंडा

चित्रपटांच्या निर्मितीसह त्यांचे दमदार प्रमोशन हा गेल्या काही वर्षांत चित्रपटकर्मींसाठी कळीचा मुद्दा झाला आहे.
facebook
facebooksakal
Summary

चित्रपटांच्या निर्मितीसह त्यांचे दमदार प्रमोशन हा गेल्या काही वर्षांत चित्रपटकर्मींसाठी कळीचा मुद्दा झाला आहे.

पुणे - चित्रपटांच्या निर्मितीसह त्यांचे दमदार प्रमोशन हा गेल्या काही वर्षांत चित्रपटकर्मींसाठी कळीचा मुद्दा झाला आहे. केवळ चांगला चित्रपट निर्माण करून न थांबता, विविध माध्यमांतून त्याचे प्रमोशन करून प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोचवणे, आता गरजेचे झाले आहे. त्यामुळे चित्रपटकर्मी प्रमोशनसाठी सतत नवनवी माध्यमे शोधत असतात.

याच माध्यमांमध्ये आता ‘फेसबुक ग्रुप’ या नव्या माध्यमाची भर पडली आहे. प्रेक्षकांशी थेट संवाद, तुलनेने कमी खर्चीक, कंटेटचे नानाविध पर्याय अशा विविध कारणांमुळे हा पर्याय चित्रपटकर्मींमध्ये रूळायला लागला आहे. फेसबुक या समाज माध्यमावरील ‘फेसबुक ग्रुप’ या सुविधेचा लाभ अनेक वापरकर्ते घेतात. यातील लोकप्रिय ग्रुपची सदस्यसंख्या पंचवीस हजार ते अगदी तीन-चार लाखांपर्यंतही असते. बहुतांश ग्रुपचे सदस्य नियमितपणे यावर संवादही साधत असतात.

फेसबुक ग्रुपच्या वापरामागील कारणे...

  • प्रेक्षकांशी थेट संवाद

  • संवादाचे विविध पर्याय

  • प्रमोशनसाठी वेळेचे बंधन नाही

  • निश्चित प्रेक्षकवर्गाला लक्ष्य करणे शक्य

  • आर्थिकदृष्ट्या तुलनेने कमी खर्चीक

  • एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी

  • प्रेक्षकांचा लगेच अभिप्राय मिळण्याची शक्यता

ज्या वेळी चित्रपटनिर्माते प्रमोशन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्या वेळी आम्हालाही आश्चर्य वाटले. फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून प्रेक्षकवर्गाला लक्ष्य करणे शक्य होते. किती प्रेक्षक चित्रपटात रस घेत आहेत, किती प्रेक्षकांना चित्रपट आवडतो आहे, या गोष्टी कळू शकतात. प्रेक्षकांनाही कलाकारांशी संवाद साधण्याची उत्सुकता असते. दोन्ही बाजूंनी फायदा असल्याने हा पर्याय लोकप्रिय होत आहे.

- सोनिया अग्रवाल, कोंजेती, संस्थापक, पुल-पुणे लेडिज ग्रुप

आपली कलाकृती पारंपरिक माध्यमांसह समाजमाध्यमांवर प्रमोशन करण्याची पद्धत काही वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. फेसबुक ग्रुपची ताकद लक्षात आल्यावर त्याही माध्यमाचा वापर चित्रपटनिर्माते करत आहेत. प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येणे, हे या माध्यमाचे बलस्थान आहे. प्रत्येक कलाकृतीचा विषय वेगळा असतो. त्यामुळे त्या विषयाशी संबंधित ग्रुपवर संबंधित चित्रपटांचे प्रमोशन केले जाते.

- मंजिरी ओक, निर्मात्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com