पुणे विमानतळावर सुविधा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - पुणे विमानतळावरून बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विमानात बसण्यापूर्वी बाळाला स्तनपान कोठे करायचे, हा प्रश्‍न पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या आईसाठी आता सुटला आहे. या विमानतळावर स्तनपान कक्ष उभारण्यात आला आहे. 

या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची रोजची संख्या वीस ते पंचवीस हजार इतकी आहे. देशातील नवव्या क्रमांकाच्या गर्दीचे म्हणून पुणे विमानतळ ओळखले जाते. या विमानतळावर आता ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

प्रवासात एकांत मिळत नसल्यामुळे बाळांना स्तनपान देण्यात अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेऊन येथे ही सुविधा देण्यात आली आहे. या स्तनपान कक्षाचे उद्‌घाटन भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यकारी संचालक केशव शर्मा यांच्या हस्ते रविवारी झाले.  

पुणे विमानतळात टर्मिनल २ मध्ये हा कक्ष आहे. कक्षात २ महिला आपल्या बाळाला आहार देऊ शकतील, अशी व्यवस्था आहे. कक्षात टीव्हीची पण व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात दृकश्राव्य माध्यमातून आईने बाळाला स्तनपान कसे करावे, याची माहिती देण्यात येईल. हा कक्ष गुप्ते हॉस्पिटलतर्फे उभारण्यात आला आहे.

आणखी दोन कक्ष आम्ही लवकरच आगमन आणि सुरक्षा कक्ष क्रमांक २ जवळ सुरू करणार आहोत. या कक्षात बाळाचा डायपर बदलण्याची सोयही उपलब्ध असेल.
- केशव शर्मा, प्रादेशिक कार्यकारी संचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण

Web Title: Facilities at Pune airport