जुन्नरला टपाल कार्यालयात आधार कार्डची सुविधा

दत्ता म्हसकर
शनिवार, 19 मे 2018

जुन्नर - शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शनिवार ता.19 रोजी जुन्नर येथील टपाल कार्यालयात आधार कार्ड सुविधा केंद्र लोकार्पण करण्यात आले. यावेळी गटनेत्या आशा बुचके, नगराध्यक्ष शाम पांडे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, संतोष नाना खैरे, दिलीप गांजळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, गटनेते दीपेश परदेशी, समीर भगत, माजी नगरसेवक शाम खोत तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

खासदार आढळराव व कार्यकर्त्यांनी यावेळी आधार कार्ड कॉपी काढून उदघाटन केले. यानंतर झालेल्या सभेत नागरिकांनी आज काढलेल्या आधार कार्ड, टपाल विमा योजनेचे लाभार्थ्यांना धनादेश, तालुक्यातील टपाल कर्मचाऱ्याचा सत्कार आढळराव यांचे हस्ते करण्यात आला. टपाल खात्याने आपल्या विविध योजनांची प्रसिद्धी करून सर्व सामान्य नागरिकांना याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन आढळराव यांनी केले. 

टपाल अधीक्षक पी.आर.कोरडे यांनी स्वागत केले.अमोल साळवे यांनी सूत्रसंचलन केले. एन.पी.मोरे यांनी आभार मानले

Web Title: Facility of Aadhaar card in post Office in Junnar