वारक-यांच्या सोयीसाठी बारामतीत सात ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची सुविधा

मिलिंद संगई
गुरुवार, 12 जुलै 2018

बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांच्या सोयीसाठी बारामतीत सात ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची सुविधा दिली जाणार आहे. महाराष्ट्र शासन व सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून ही सुविधा पुरविली जाईल. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. 

बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांच्या सोयीसाठी बारामतीत सात ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची सुविधा दिली जाणार आहे. महाराष्ट्र शासन व सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून ही सुविधा पुरविली जाईल. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. 

बारामतीतील शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, टीसी कॉलेज रोड, परकाळे बंगल्यासमोर संगम पूलानजिक, हॉटेल सुदीत समोर, देसाई इस्टेट परिसर, मोतीबाग चौक, मार्केट यार्ड परिसर, क-हा नदीकिनारी दाते यांच्या गणेश मंदीरानजिक अशा सात ठिकाणी पाचशे शौचालयांची सुविधा वारक-यांना पुरविली जाणार आहे अशी माहिती बारामती परिसर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष दिग्विजय तुपे यांनी दिली. शुक्रवारी (ता. 13) रात्री अकरा नंतर पहाटेपर्यंत ही सुविधा वारक-यांसाठी दिली जाणार आहे. 

दरम्यान बारामती नगरपालिकेच्या वतीने वारकरी तसेच वारक-यांना सेवा देणा-या सर्वच मंडळांना प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर न करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी यंदाचा पालखी सोहळा प्लॅस्टिकमुक्त असावा या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. बारामती नगरपालिकेच्या वतीने वारक-यांची गैरसोय होऊ नये या साठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली असून पालखीचा मुक्काम शारदा प्रांगणातील भव्य शामियान्यात असेल. आज मुख्याधिका-यांसह पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी पालखी मार्गाची पाहणी करुन आवश्यक उपाययोजना केल्या. सकाळ यीनच्या स्वयंसेवकांच्या वतीने पालखी सोहळा बारामतीतून गेल्यानंतर बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागास स्वच्छतेसाठी मदत केली जाणार आहे.

Web Title: Facility of public toilets in seven places in Baramati for the convenience of the Wark