मिटकॉम तर्फे आयोजित विद्याशाखा विकास कार्यशाळा संपन्न

The Faculty Development Workshop organized by Mitcom
The Faculty Development Workshop organized by Mitcom

लोणी काळभोर  - शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीचे नाते तयार करावे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर तयार होईल. कृतीशिलतेवर आधारीत शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्यास त्याचा करिअर घडविताना फायदा होईल. त्यामुळे शिक्षकांनी प्रयोगशीलतेबरोबर कृतीशील शिकवणीवर भर द्यावा, असे प्रतिपादन, एनआयटीआयई (नीती) मुंबईचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजीव वर्मा यांनी केले.

लोणी काळभारे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम) तर्फे विद्याशाखा विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख व्याख्याते या नात्याने बोलताना प्रा. शर्मा यांनी वरील विधान केले. 

यावेळी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. मंगेश. कराड, कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या (मिटकॉम) संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुनील राय आदी उपस्थित होते.

प्रा. संजीव वर्मा म्हणाले, शिक्षकांविषयीचे आदर हे विद्यार्थ्यांच्या ह्दयातून निर्माण झाल्यास शिकवणीसाठी याचा फायदा होईल. शिक्षकांने वर्गात विद्यार्थ्यांचे मित्र बनत प्रयोगशील आणि कृतीशील शिक्षण द्यावे. अशा पद्धतीचे शिक्षण व शिकवणी विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहते. शिक्षकांनी केवळ ज्ञान आदान-प्रदानाचे माध्यम बनू नये. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या चौहीबाजूने विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षक बनावे. विद्यार्थ्यांना अपयशाची चिंता करू न देता वेगवेगळ्या कल्पनांना मृत रुप देण्यासाठी प्रोजेक्ट बेस्ड टिचींग शिक्षकांनी करावे. कल्पना, नवसंशोधन, नव विचारशक्ती, भविष्याची दिशा आणि प्रेरणादायी शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांला भविष्याला आकार देताना याचा फायदा होईल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. मंगेश कराड म्हणाले, कोणत्याही प्रकारचे मॅनेजमेंट शिक्षण हे कृतीशील बाबींवर आधारीत असावे लागते. प्रयोगाला कृतीची साथ दिल्यास सुवर्णमयी भविष्य घडण्यास मदत होते. पुणे शहर हे पश्चिमेकडचे ऑक्सफोर्ड शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आधुनिक शिकवण पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. 

वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. त्यामुळे पाश्चात्य देशातील शिक्षण पद्धतीचा स्वीकार करून शिक्षकांनी शिकवणी करावी. यामुळे विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडण्यास मदतच होईल. शिक्षकांनी विविध केस स्टीडीज आणि विषयाशी संबंधीत अभ्यास करूनच शिकवणीला जावे. विद्यार्थ्यांनी विविध आव्हान लिलाया पेलण्यासाठी नवनवीन संकल्पना शिक्षकांनी वर्गात मांडाव्यात.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com