मोदी सरकारपेक्षा फडणवीस सरकारचे काम चांगले : अण्णा हजारे

pune.jpg
pune.jpg

पुणे : 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण कण्यासंदर्भात विधेयक पारित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यात प्रभावी लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्याबाबत लोकायुक्त अधिनियम 1971 दुरुस्तीसाठी संयुक्त मसुदा समिती आणि शासनाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक यशदा येथे सुरू आहे. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. अण्णा हजारे यांच्यासह समितीचे सदस्य माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, विश्वंभर चौधरी, शाम असावा, संजय पठाडे तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com