...आणि एटीएम फोडण्याच्या प्लॅन फसला; गॅस कटर तिथेच सोडून चोरटे प्रसार

 Failed attempt of theft at ATM of IDBI Bank by gas cutter in Narayangaon
Failed attempt of theft at ATM of IDBI Bank by gas cutter in Narayangaon

नारायणगाव(पुणे) : पुणे नाशिक महामार्गा लगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम गँसकटरच्या साहाय्याने आज पहाटे फोडण्याचा तीन चोरट्यांचा प्रयत्न फसला. वॉचमेनचे प्रसंगावधान व नारायणगाव पोलिसांची तत्परतेमुळे हे शक्य झाले. 

पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. पोलिसांना घटनास्थळी गॅससकटर व गॅस सिलेंडर आढळून आला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के.गुंड म्हणाले, ''पुणे नाशिक महामार्गालगत आयडीबीआय बँक व पु.ना. गाडगीळचे दागिन्यांचे शोरूम आहे. आज पहाटे सव्वा दोन वाजण्याचा सुमारास दुचाकीवरुन तीन आज्ञात चोरटे आले. त्यांनी गॅससकटरच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्याने पु.ना. गाडगीळच्या शोरूमच्या वॉचमेनला जाग आली. चोरी होत असल्याची माहिती त्याने नारायणगाव पोलीस स्टेशनला दिली. रात्र गस्तीवरील मोबाइल वाहन घेऊन सहायक पोलिस निरीक्षक गुंड व त्यांचे  सहकारी तात्काळ घटनास्थळी आले. दरम्यान पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. यामुळे एटीएम मधील ७ लाख ६० हजार रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली.''

''नुकतेच मंचर येथे एटीएम मशीन पळवुन नेण्याची घटना घडली आहे.वारंवार सूचना देऊन सुद्धा बँक प्रशासनाने एटीएमच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली नाही. सीसीटीव्हि कॅमेरा बसविला नाही.बँक प्रशासन बे फिकीर आहे.हीच स्थिती इतर काही बॅंकांची आहे.''
- डी. के.गुंड (सहायक पोलिस निरीक्षक)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com