गणित आले नाही म्हणून विद्यार्थ्याच्या घशात कोंबली छडी

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

येथील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शारीरिक छळ करण्यात आला. या शाळेतील गणिताच्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला गणित सोडवता न आल्याने त्याने त्याच्या हातातील लाकडी छडी त्याच्या घशात कोंबली. ही धक्कादायक घटना पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली. 

पिंपळगाव : येथील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शारीरिक छळ करण्यात आला. या शाळेतील गणिताच्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला गणित सोडवता न आल्याने त्याने त्याच्या हातातील लाकडी छडी त्याच्या घशात कोंबली. ही धक्कादायक घटना पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली. 

School students pune

कर्जत उपजिल्ह्यातील पिंपळगाव गावातील एका शाळेत ही घटना मंगळवारी घडली. याच शाळेतील गणिताचे शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदे याने रोहन जंजिरे या आठ वर्षीय विद्यार्थ्यास गणित सोडविण्यासाठी दिले होते. मात्र, पीडित विद्यार्थ्याला दिलेले गणित सोडविता आले नाही. म्हणून संतापलेल्या शिंदेने त्याच्या हातातील छडीच त्या विद्यार्थ्याच्या घशात कोंबली, अशी माहिती कर्जत पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी एस. बी. म्हेत्रे यांनी दिली. 

दरम्यान, या गंभीर अशा प्रकारामुळे आठ वर्षीय विद्यार्थी रोहन हा अत्यंत भयभीत झाला. त्याच्या तोंडात छडी कोंबल्याने त्याला बोलता येत नाही. रोहन सध्या पुण्यातील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. 

Web Title: Failed to solve math problem Maharashtra school teacher pierces Class 2 boys throat with cane