बनावट सोन्याचे बिस्किट देऊन फसवणारी टोळी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे : तांब्याच्या धातूला सोन्याचा मुलामा देऊन हे सोने सराफांना विकणाऱ्या चौघांच्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २८ लाख रुपयांचे ८०० ग्रॅम सोने जप्त केले आहे.

पुणे : तांब्याच्या धातूला सोन्याचा मुलामा देऊन हे सोने सराफांना विकणाऱ्या चौघांच्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २८ लाख रुपयांचे ८०० ग्रॅम सोने जप्त केले आहे.

टोळीचा सुत्रधार प्रितम भळगट उर्फ ओसवाल (वय ४३, रा.  कोल्हापूर) याच्यासह नितीन दलीचंद ओसवाल (वय ४०, रा. इस्लामपूर), विलास माणिक खामकर (वय ३७, इस्लामपूर),  महेश मोहन पाटील (वय २५, रा.  कोल्हापूर) या चौघांना अटक केली आहे. दिनेश ओसवाल (वय ४२, रा. कोंढवा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.  
या टोळीने अनिल पामेचा (रा. मुंबई), प्रकाश सेमलानी (रा. मुंबई) गौतम परमार (रा. गुरुवार पेठे) या तिघांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.  

गुगल अॅपवरून सराफ व्यापाऱ्य़ांचे नंबर घेऊन त्यांना सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर देत, त्याबदल्यात त्यांना सोन्याचे बिस्किट देत. यामध्ये सराफ व्यापार्यांचा फायदा असल्याने ते सोन्याची बिस्किटे घेत.  मात्र या बिस्किटांवर केवळ सोन्याचा मुलामा दिलेला असून, आतमध्ये तांबे असल्याचे दिनेश ओसवाल यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासातून हा गुन्हा उघडकीस आणला.  

आरोपींना बेटिंग,  कसिनोचा शौक
प्रितम, नितीन या दोघांचे पुर्वी सोन्याचे दुकान होते, पण त्यांना जुगार,  क्रिकेट बेटिंग खेळण्याचा, तर महेशला गोव्यात जाऊन कसिनो मध्ये पैसे लावण्याचा शौक होता. याच पैसे हरल्याने त्यांचे दुकान बंद पडले. त्यानंतर अशा प्रकारे फसवणूक करून त्यातून लाखो रुपये कमावले.

Web Title: Fake gold biscuit with fraudulent gang arrested