Pune News : कासुर्डीच्या पर्वती इंडस्ट्रीज कंपनीवर पोलीस कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake gypsum flax manufactured in company under Mor Chap crime pune

Pune News : कासुर्डीच्या पर्वती इंडस्ट्रीज कंपनीवर पोलीस कारवाई

यवत : कासुर्डी (ता. दौंड) येथील पार्वती इंडस्ट्रीज या नावाने सुरू असलेल्या कंपनीत मोर छाप नावाने बनावट जिप्सम व भेसयुक्त सनला तयार केला जात असल्याच्या तक्रारी वरून दौंडच्या उपविभायगीय अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत कंपनी सील केल्याची माहिती यवत पोलीसांनी दिली.

पार्वती इंडस्ट्रीज या कंपनीत मोर छाप नावाने सनला व जिप्सम प्लॅस्टर बनवले जात होते. मोर छाप नाव, ट्रेडमार्ग व बनावट रजीस्टेशन नंबर वापरून ही भेसळयुक्त उत्पादने बाजारात विकली जात होती. या बाबत मोर छाप जिप्सम प्लॅस्टर कंपनीचे मालक सुनिल माणिकचंद कासलीवाल (रा. मनमाड जि. नाशिक) यांचे तक्रारीवरून यवत पोलीसांत गुन्हा दाखव करण्यात आला असल्याचीही माहिती यवत पोलींनी दिली आहे.

कासुर्डी येथे कंपनीवर पोलीसांनी छापा टाकला तेंव्हा तेथे उत्पादन प्रक्रीया सुरू होती. मुळ कंपनी मोरछाप जिप्सम प्लॅस्टार या कंपनीच्या नावास मिळते जुळती नावे तयार करून न्यू मोरछाप जिप्सम प्लॅस्टर रजि. नं.2983289 व नंबर वन मोर छाप सनला लाईन पावडर रजि. नं. 3878883 या नावाच्या बॅग मिळून आल्या.

ही नावे बनावट असून ट्रेडमार्ग म्हणून वापरलेले क्रमांक हे ट्रेड़मार्क मागणी करण्यासाठी केलेल्या अॅप्लिकेशनचे नंबर आहेत असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. पार्वती इंडस्ट्रीचे मालक निलेश रधुनाथ भोंडवे हे इतर ब्रॅंडचे चिन्हाचा व नावाचा वापर करून माल विक्री करून शासनाची फसवणूक करतात त्याच बरोबर ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करतात हे समोर अल्याने त्यांचे मशनरी व साठा सिल करण्यात आला आहे.

त्याच बरोबर व्यापार चिन्ह कायदा कलम 102, 103, 104 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्ष युवराज पाटील सहाय्यक फौजदार नंदकुमार केकाण, पोलीस हवालदार दिपक वायकर, कमलेश होले, अक्षय कुंभार, निलेश कदम, अक्षय यादव, प्रमोद गायकवाड य़ांचा समावेश होता.

टॅग्स :policecrime