esakal | खेळाची बनावट कागदपत्रे सादर करुन बनला पोलिस उपनिरीक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

fake police

Pune : खेळाची बनावट कागदपत्रे सादर करुन बनला पोलिस उपनिरीक्षक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पॉवर लिफ्टींग खेळाची राष्ट्रीय स्तरावरील बनावट कागदपत्रे सादर करून पोलिस उपनिरीक्षकाची नोकरी प्राप्त करणाऱ्या एका ठगाविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. क्रीडा विभागाने केलेल्या तपासणीमध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर फसवणूकीचे बिंग फुटले.

महादेव अशोक सपकाळ (रा.शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोदिनी अरुण अमृतवाड (वय 57) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमृतवाड या येरवडा येथील विभागीय क्रीडा कार्यालयातील पुणे विभागाच्या क्रीडा व युवक सेवाच्या उपसंचालिका आहेत.

सपकाळ याने तामिळनाडू येथील कोईमतुर येथे 4 ते 9 ऑगस्ट 2010 या कालावधीत झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग चॅम्पियनशीपमध्ये सहभाग घेऊन 75 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविल्याचे खोटे व बनावट प्रमाणपत्र मार्च 2017 मध्ये फिर्यादी यांच्या कार्यालयाकडे जमा केले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने खेळाडुंसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातुन पोलिस उपनिरीक्षकाची नोकरी मिळविली. संबंधीत कार्यालयाकडून सपकाळ याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

हेही वाचा: पवना धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तेव्हा, त्याने बनावट व खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले. तेवढ्यावरच न थांबता त्याने या प्रमाणपत्राचा वापर करून पोलिस उपनिरीक्षकाची नोकरी मिळवून विभागीय क्रीडा कार्यालय व शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार, अमृतवाड यांनी त्याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.ए.खटके करीत आहेत.

loading image
go to top