यू ट्यूब पाहून बनविल्या पुण्यात बनावट नोटा 

यू ट्यूब पाहून बनविल्या पुण्यात बनावट नोटा 

पुणे - यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहून दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या तरुणाला मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौकातून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली.

सोहेल सलीम शेख (वय २१, रा. देहू रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बनावट नोटा तयार करणारा हा तरुण नरपतगिरी चौकात आल्याची माहिती पोलिस कर्मचारी शंकर संपते यांना मिळाली. त्यावरून युनिट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अश्‍विनी जगताप यांच्या  पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. त्याच्या ताब्यातून दोनशे रुपयांच्या सात नोटा जप्त करण्यात आल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com