नोकरीच्या आमिषाने 40 विद्यार्थ्यांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

हिंजवडी : रिलायन्स कंपनीचा वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करीत असल्याचे बनावट पुरावे दाखवून नोकरी व स्कॉलरशिप मिळवून देण्याचे आमीष दाखवत सुमारे 40 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी मनोज प्रल्हाद मल्होत्रा (वय 52) रा. वडगाव बुद्रुक यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वाकड येथील इंडस बिझनेस स्कूलमधील विद्यार्थ्यांना रिलायन्स कंपनीत नोकरी व स्कॉलरशिप देण्याचे आमीष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. 

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील अनुप पंढरीनाथ ढोरमले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मुकेशसिंग खताना या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून रिलायन्स कंपनीचा मॅनेजर असल्याचा बनाव केला होता. त्याने इंडस स्कूलमधील सुमारे 40 मुलामुलींच्या मुलाखती घेऊन त्यांना रिलायन्समध्ये नोकरी देण्याचे आमीष दाखवले होते. तर काही विद्यार्थ्यांना नोकरीसोबत स्कॉलरशिपही मिळवून देतो म्हणून प्रत्येकी 550 प्रमाणे पैसे उकळले होते. रिलायन्स कंपनीत नोकरीच्या अमिषाने त्याने सुमारे 39 विद्यार्थ्यांकडून पैसे जमा केले होते. 
 
Web Title: fake reliance manager deceives 40 students in hinjewadi