भाजप नेत्यांकडून खोटा इतिहास - बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास मांडत आहेत. त्यांचा हा बुरखा गळून पडेल,’’ असे सांगत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने लोकांच्या हिताचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी थोरात बोलत होते. खासदार कुमार केतकर, आमदार भाई जगताप, माजी खासदार रजनी पाटील, माजी आमदार उल्हास पवार, आमदार मोहन जोशी, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड, आबा बागूल आदी या वेळी उपस्थित होते. 

केतकर म्हणाले, ‘‘भाजपची सत्ता जाणार असल्याने या पक्षाचे वरिष्ठ नेते रिझर्व्ह बॅंक, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात (सीबीआय) त्यांच्या विचारांचे अधिकारी नेमत आहेत. त्यातून या यंत्रणा हाती ठेवण्याचा त्यांचा डाव असून, त्यामुळे घातकी सरकारला सत्तेपासून रोखले पाहिजे.’’ 

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, असे पाटील यांनी सांगितले.

राफेल घोटाळा, नोटाबंदी आणि विकासदर घसरल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
- बाळासाहेब थोरात, आमदार

Web Title: False history by BJP leaders Balasaheb Thorat Politics