धरणग्रस्त कुटुंबाचे जुन्नरला उपोषण

दत्ता म्हसकर
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

जुन्नर : पुनर्वसन अंतर्गत मिळालेल्या जमिनीवरील अतिक्रमण दूर करावे या मुख्य मागणीसाठी वडज (ता.जुन्नर) येथील धरणग्रस्त कुटुंबाने आज (ता.6) जुन्नर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. विद्या व लक्ष्मण जाधव हे पतीपत्नी तसेच कुटुंबातील सदस्य उपोषणास बसले होते.

यावेळी आमदार शरद सोनवणे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन चर्चा केली. तहसिलदार हणमंत कोळेकर उपोषणकर्त्याची दखल घेत पुनर्वसन कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगितले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 

जाधव यांची वडज धरणात जमीन गेल्याने ते धरणग्रस्त झाले असून त्यांना हापुसबाग ता.जुन्नर येथे पर्यायी जमीन देण्यात आली आहे. त्याची ताबा पावती तसेच सातबारा नोंद झाली मात्र या जमिनीवरील बळजबरीने झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी जाधव 2005 पासून शासन दरबारी न्याय मागत आहेत कागदोपत्री पाठपुरावा करत आहेत मात्र त्यांना सरकारी कार्यालयाकडून सहकार्य मिळत नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Family in Damarea Fasting in Junnar