कोरोनाबाधित डाॅक्टरांना समाजाकडून मिळालेल्या वेदना डोळ्यात पाणी आणतील... 

corona
corona

पाटस (पुणे) : सध्या पुणे शहरासह ग्रामीण भागातही कोरोना संर्सगाचा आलेख वाढताना दिसत आहे. मात्र, कोरोनाबाधित व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबाला आजारापेक्षा समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याची अनेक उदाहरणे आज समोर येत आहे. समाजाच्या या वेगळ्या नजरेतून कोरोना योद्धा डाॅक्टरसुद्धा बचावले नाही. 

असाच एक अनुभव दौंड तालुक्यातील पाटस येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या डाॅक्टर दांपत्यांच्या पदरी पडला. त्यातून त्यांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला. मात्र, प्रकृती व्यवस्थीत होऊन परतल्यानंतर त्यांनी कोरोनाचे आभार मानत कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला आणि कोरोनाबाधित व्यक्तींविषयी अफवा पसरविण्यापेक्षा त्यांना मानसिक आधार द्या, असा मोलाचा सल्ला समाजाला दिला. लोकांनी कोरोनाबाधितांवर किंवा संशयितांवर बहिष्कार टाकणे गैर आहे. समाजाची भूमिका व मानसिकता बदलणे गरजेचे आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावात शासकीय असो किंवा खासगी अनेक डाॅक्टर जिवावर उदार होऊन आपल्या कर्तव्याची चोख भूमिका बजावत आहेत. देशावर परकीय शत्रुने हल्ला केल्यावर सीमेवरील सैनिक जसा पराक्रम गाजवितो, तसा काहिसा कोणत्याही विषाणूने मानवाच्या आरोग्यवर हल्ला केल्यावर डाॅक्टर हा सैनिकाच्या भुमिकेत लढत असतो. पण, या आक्रमणापुढे हा योद्धा चुकून कोरोनाच्या अपघाताने बाधीत झाला, तर समाज म्हणून प्रत्येकाने डाॅक्टरांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. पण, समाजात वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या डाॅक्टरांना देखील वाळीत पडल्याचा अनुभव मिळतो आहे.

दौंड तालुक्यातील पाटस येथे वैद्य हाॅस्पीटल आहे. यामध्ये वैद्य कुटुंबातील चारही जण डाॅक्टर आहेत. डाॅ. धवल वैद्य हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते आपल्या दवाखान्यात काम करत असताना 20 जून रोजी त्यांना तालुक्यातील एका डाॅक्टरांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे समजले. मात्र, ते कामानिमित्त दोनदा संबधित डाॅक्टरांच्या संर्पकात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी घरामध्ये स्वतःला तत्काळ विलगीकरण करून घेतले. डाॅ धवल व त्यांच्या पत्नी डाॅ. मृणाल हे दोघेही स्वतःहून कोरोना तपासणीसाठी गेले. मात्र, प्रयोगशाळेचा अधिकृत अहवाल येण्याच्या अगोदरच, डाॅ. धवल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते आयसीयूत आहेत, अशा प्रकारे वेगवेगळ्या अफवांचा जणू पाऊसच सुरु झाला. 

दरम्यान, 22 जूनला प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात दोघांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. घरात ज्येष्ठ मंडळी असल्याने हे दांपत्य विलगीकरणासाठी हडपसरला निघाले. त्यावेळी वेगळाच अनुभव या कुटुंबाच्या पदरात पडला. गावातील काही लोकांनी त्यांचे गेट अडवून ठेवले. सरकारी अधिकारी आल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, असा आग्रह धरला. या दापंत्याला पाच वर्षाचा लहान मुलगा आहे. आईवडिलांपासून लांब राहावे लागणार असल्याने मुलाने मोठ्याने हंबरडा फोडला.घरातील सदस्यांनी त्याला कसबस शांत केले. त्यानंतर हे दोघेही उपचारासाठी गेले. या वेळी लोकांची वागणूक, घरातील विस्कळीत झालेली परिस्थिती, घरातील सर्वांचे तपासणी अहवाल काय येतील, त्यातच हाॅस्पीटलमध्ये प्रसूती झालेल्या काही महिला अॅडमीट आहेत. त्यांचे काय होणार, यासारख्या अनेक विचारांनी दोघांच्या डोक्यात थैमान घातले होते.

दरम्यान, सुदैवाने कुटुंबातील इतर व्यक्तींचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला. तत्पूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने हाॅस्पीटल व आजूबाजूचा परिसर सील केला होता. डाॅक्टर आईवडिल घरीच होते. मात्र, आजूबाजुचे लोक कोणालाच घरी येऊन देत नव्हते. घरी दूध, पालेभाज्या, किराणा येत नव्हता. त्यामुळे घरातील व्यक्तींचे खूप हाल होत होते. मात्र, काही लोकांनी मदत केली. कोरोनाबाबत लोकांमधील अज्ञानामुळे मनस्ताप सोसावा लागला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, हाॅस्पीटलमध्ये कोरोनाचा प्रवास सुखकर झाल्याचे डाॅ. धवल वैद्य यांनी सांगितले. आम्ही पती-पत्नी दोघेही एकमेकांना आधार देत होता. एकंदरीत कोरोनामुक्त होणे फार अवघड नाही. अनेक रुग्ण बरे होतात. काही लोकांना लक्षणे नसल्याने त्यांना कोरोना होऊन गेल्याचे पण समजत नाही. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले म्हणजे लगेच कोरोना होतो, असे नाही. प्रतिकारशक्तीवर ते अवलंबून आहे. कोरोना रुग्ण हा कोरोनामुळे कमी आणि इतर मानसिक त्रासानेच मरतोय. कोरोनाला ईझी घ्या. मानसिक आधार व योग्य उपचाराने रुग्ण बरा होतो, असेही डाॅ. धवल वैद्य यांनी स्पष्ट केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com