संसार मोडला; पण जीव वाचला!

Aids
Aids

पुणे - आजार लपवून ठेवत लग्न केल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. अदृश्‍य आजार लवकर लक्षात येत नसल्याने लग्नानंतर अनेकांचा संसार उद्‌ध्वस्त झाला आहे. अशाच एका प्रकरणातून नर्सची सुटका झाली. ती लग्नाच्या फसव्या बेडीत अडकली. मात्र, एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजारातून बचावली.

लग्न झाल्यानंतर पूजेच्या दिवशी सुप्रिया फ्रिजमध्ये ठेवलेली वस्तू घेण्यासाठी गेली. त्या वेळी फ्रिजमध्ये असलेल्या काही औषधांविषयी तिच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे तिने ती औषधे तपासणीसाठी दिली. संबंधित औषधे ही ‘एचआयव्ही’ झालेल्या रुग्णाची असल्याचे तपासणीत उघड झाले. पतीने ‘एचआयव्ही’ असल्याची बाब लपवून लग्न केल्याचे स्पष्ट झाल्याने तिला मोठा धक्का बसला. त्यामुळे तिने माहेर गाठले आणि पती अनुज (दोन्ही नावे बदललेली) याच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज केला. समुपदेशनानंतर त्याने तिला घटस्फोट देण्याचे मान्य केले. त्यासह लग्नासाठी केलेला खर्च म्हणून पाच लाख रुपये सुप्रिया हिच्या कुटुंबीयांना दिले.

अनुज हा संगणक अभियंता आहे. त्यांचे अरेंज मॅरेज आहे. फ्रिजमध्ये सापडलेल्या औषधांची तपासणी झाल्यानंतर सुप्रियाने त्याला ‘एचआयव्ही’ आहे का? अशी विचारणा केली. त्यास त्याने नकार दिला. त्यामुळे सुप्रियाने पतीकडे तपासणी करण्याची मागणी केली. त्यालाही त्याने विरोध केला. मात्र, पत्नीच्या हट्टामुळे अखेर तो चाचणी करण्यास तयार झाला. दोघांचीही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अनुजला ‘एचआयव्ही’ असल्याचे निष्पन्न झाले. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना समुपदेशनासाठी ॲड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यात त्याने लग्नापूर्वी ‘एचआयव्ही’ असल्याचे मान्य केले नाही. वैद्यकीय अहवाल पाहून समुपदेशनानंतर काही कालावधीतच न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com