ताणतणाव नियंत्रणात मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची

dr.jagdish-hiremth
dr.jagdish-hiremth

दौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात ह्रदयरोग तज्ज्ञ डॅा. जगदीश हिरेमठ यांनी दिला आहे. दौंड शहरातील महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल अॅण्ड डेन्टल क्लिनिकचे उद्घाटन डॅा. जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते झाले व त्या प्रसंगी ते बोलत होते. 

डॅा. सुमन सरदेसाई, हॅास्पिटलचे संचालक डॅा. दत्तात्रय लोणकर, आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणे, राहुल जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अरूण कुदळे, प्रेमसुख कटारिया, वीरधवल जगदाळे, डॅा. शलाका करंडे, डॅा. संपदा लोणकर, शैलजा लोणकर, डॅा. सुशांत पर्बत, आदी उपस्थित होते. 

डॅा. जगदीश हिरेमठ म्हणाले, `` डॅा. दत्तात्रय लोणकर यांनी पैशांचा विचार न करता अहोरात्र रूग्णांची सेवा केलेली आहे व त्यांचा सेवेचा वारसा त्यांची पुढील पिढी सुसज्ज रूग्णालयात जोपासत आहे. विविध प्रकारचे प्रदूषण, कोंडी आणि धावपळीची जीवनशैली मुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी होणारा खर्च पाहता आपात्कालीन परिस्थितीत पैशांची जुळवाजुळव करण्यापेक्षा वैद्यकीय विमा काढावा. ``

शशांक मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर डॅा. संजीव कारंडे यांनी आभारप्रदर्शन केले. 

निरोगी जीवनशैलीसाठी डॅा. जगदीश हिरेमठ यांच्या टिप्स.....
* चांगले दिसण्यासाठी नव्हे तर स्वादुपिंडासाठी पोट कमी करा.
* सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू व व्यसने टाळाच.
* दर आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम करावा.
* योग्य व संतुलित आहार घ्या.
* विनोदबुध्दी जागृत ठेवा. 
* भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीशी चांगले वागावे - बोलावे.
* आपणच शहाणे आणि समोरची व्यक्ती मूर्ख, अशा विश्वात राहू नये.
* प्रामाणिक असावे परंतु सतत गंभीर असू नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com