पीएमपीच्या मध्यरात्रीच्या प्रवासात कुटुंबाची ससेहोलपट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - पीएमपी बसच्या मध्यरात्रीच्या प्रवासात आरक्षित जागेवर महिलेला बसून देण्याची विनंती केल्यावर कंडक्‍टरने संबंधित कुटुंबाला शिवीगाळ करून धमकविण्याची घटना मध्यरात्री घडली. प्रवासादरम्यान कुटुंबप्रमुखाला बसमधून बळजबरीने उतरविण्यात आले. या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या कुटुंबाला हद्दीच्या वादावरून पोलिसांनीही ताटकळत ठेवले. पीएमपीमध्ये मध्यरात्रीचा प्रवास किती बेभरवशाचा होत आहे, हेच या घटनेतून अधोरेखित झाले. दरम्यान, त्या कंडक्‍टर आणि चालकाविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हनुमंत पवार (वय 31, रा. कात्रज) हे पत्नी, सात वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांच्या पुतणीसह रात्री बाराच्या सुमारास स्वारगेटहून कात्रजकडे जाण्यास बसमध्ये बसले. मुलगी झोपलेली असल्यामुळे त्यांच्या कडेवर होती. गर्दी असल्यामुळे पवार यांनी महिलांच्या आरक्षित जागेवर पत्नीला बसू द्यावे, अशी तेथील युवकांना विनंती केली. परंतु, त्यांनी नकार दिला. त्यामुळे पवार यांनी कंडक्‍टरला सांगितले. वादविवाद झाल्यावर कंडक्‍टरने त्यांना शिविगाळ करून धमकविले. पवार यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी मोबाईलवरून संपर्क साधला. दरम्यान पुष्प मंगल कार्यालय चौकात कंडक्‍टर आणि ड्रायव्हरने पवार यांना खाली उतरविले. पत्नी, मुलगी आणि पुतणी बसमध्येच होती. पवार यांनी पत्नीशी मोबाईलवरून संपर्क साधला अन्‌ त्यांना कात्रज पोलिस चौकीत जाण्यास सांगितले. दरम्यान, पवार यांनी संपर्क साधल्यावर पोलिस पुष्प मंगल कार्यालय चौकात आले. कात्रज, सहकारनगर आणि पर्वती येथील कोणत्या पोलिस चौकीत तक्रार द्यायची, यावर त्यांचा खल झाला. अखेर पहाटे दोन-अडीचच्या सुमारास पवार यांची तक्रार सहकारनगर पोलिस चौकीत नोंदवून घेण्यात आली. त्यानुसार संबंधित कंडक्‍टर, ड्रायव्हरविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर कंडक्‍टरनेही दिलेल्या फिर्यादीवरून पवार यांच्याविरुद्ध शासकीय कामात हस्तक्षेपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

घटनेची माहिती घेऊन कारवाई करू 
याबाबत पीएमपीचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड म्हणाले, ""संबंधित घटनेतील कंडक्‍टर, ड्रायव्हरविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती घेण्यात आली आहे. तसेच त्यांनीही तक्रार दिली आहे. या सर्व प्रकरणाची माहिती संकलित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करू.'' 

Web Title: family PMP midnight journey