आज फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ ; मदर्स डे निमित्त तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉकचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी जागतिक "मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर रविवारी (ता. 13) सकाळी साडे सहा वाजता एकत्र येऊन चालण्याचा उपक्रम "सकाळ'ने आयोजित केला आहे.

पुणे : अवघ्या कुटुंबाला एकत्र जोडणाऱ्या, सांभाळणाऱ्या आईच्या दातृत्वाला आणि कष्टाला सलाम करण्यासाठी जागतिक "मदर्स डे' निमित्त निसर्गरम्य तळजाई टेकडीवर रविवारी (ता. 13) सकाळी साडे सहा वाजता एकत्र येऊन चालण्याचा उपक्रम "सकाळ'ने आयोजित केला आहे. कला, साहित्य, राजकारण, उद्योग, प्रशासन, आदी विविध क्षेत्रातील सेलीब्रेटी, मान्यवरही त्यात कुटुंबासह सहभागी होणार आहेत. 

महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्‌घाटन होणाऱ्या या कार्यक्रमास गायक- संगीतकार सलील कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आङेत तर, अभिनेत्री सुवर्णा काळे, रिना लिमण व मॉडेल अनुजा शिंदे या देखील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 

आपल्या जन्मापासून ते आपला संसार फुलविण्यापर्यंत आई राबत असते. मुलांवरील प्रेमापोटी ती कष्ट झेलत जाते आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत जाते. मातृत्वाची ही सावली आपल्याबरोबर कायम राहावी, या हेतूने "फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ' हा उपक्रम राबविला आहे. आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक पुणेकरालाही या उपक्रमात आपल्या कुटुंबासह सहभाग घेता येणार आहे. त्यामुळे आई, पत्नी, मुलांसह या "फॅमिली वॉकथॉन वुईथ सकाळ'च्या "मॉर्निंग वॉक' उपक्रमात प्रत्येकाने अवश्‍य सहभाग नोंदवावा, असे आवाहन "सकाळ'तर्फे करण्यात आले आहे. 

कुठे (मार्ग) : निसर्गरम्य तळजाई टेकडीवरील तळजाई मंदिर-ठुबे बंगला 
कधी : रविवार, 13 मे 
केव्हा : सकाळी साडे सहा 
सहभाग : प्रत्येक पुणेकरांसह विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटी 

Web Title: Family Walkthon With Sakal Morning Walk Program on the scenic Taljai hill on the occasion of Mothers Day