#FamilyPlanning कुटुंब नियोजनासाठी आता नवा फंडा

प्रियांका तुपे
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे - रेश्‍मा म्हणतेय, ‘‘मला एक मुलगी असून, दुसरे मूल हवे की नको यावर आम्ही अजून ठाम झालो नाही. त्यामुळे मी कॉपर-टी वापरत आहे. शस्त्रक्रियेपेक्षा हा उपाय सोपा वाटतो.’’ तर सारिका म्हणते, ‘‘गर्भनिरोधक गोळ्या मी काही वेळा वापरल्या; पण त्यापेक्षा निरोध वापरणं आरोग्याच्या दृष्टीने जास्त सोयीचं वाटतं. याबाबत मी पतीसोबतही बोलले. तेव्हापासून आम्ही निरोधचाच वापर करतो.’’....अलिकडील काळातील कुटुंब नियोजनाचा हा नवा फंडा रेश्‍मा आणि सारिकाप्रमाणे अनेकींनी अवलंबलाय. पर्यायाने कुटुंब नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांच्या प्रमाणात मोठी घट झालीय.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्रियांनीच केली पाहिजे, हा समज आता बदलत आहे. अलीकडील काळात महिला या शस्त्रक्रियेपेक्षा गर्भनिरोधक साधनांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षांपासून स्त्रियांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडील आकडेवारी सांगतेय. शस्त्रक्रियेऐवजी गर्भनिरोधक गोळ्या, निरोध आणि प्रसूतिपश्‍चात तांबी वापरण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या गेल्या वर्षात राज्यातील जवळपास अडीच लाख महिलांनी घेतल्या आहेत.

महिलांची पसंती गर्भनिरोधक साधनांना
गोळ्या, इंजेक्‍शनसह अन्य पर्यायांचा वापर

गर्भनिरोधक इंजेक्‍शन
आरोग्य विभागाकडून गर्भनिरोधक इंजेक्‍शन देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. दर तीन महिन्यांनी हे इंजेक्‍शन महिलांना दिले जाते. त्याला ग्रामीण भागातील महिला प्रतिसाद देत आहेत.

आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांमुळे कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती वाढत आहे. महिलांमध्ये गर्भनिरोधकांविषयी पूर्वी असणारा संकोच कमी होऊन त्या अधिक सजग बनत आहेत.
- डॉ. नंदकुमार देशमुख, सहायक आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग
 
विशेषत: पस्तिशीच्या आतल्या महिला गर्भनिरोधक उपायांबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूक झाल्या आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्यात त्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करून घेण्याकडे महिलांचा कल कमी होत आहे.
- डॉ. दिलीप काळे, स्त्रीरोगतज्ज्ञ

गर्भनिरोधकांना प्रतिसाद का?
 शस्त्रक्रिया करावी लागत नाही.  
 महिलांना गर्भनिरोधक गोळ्या घरपोच मिळतात.
 जनजागृती वाढत आहे. 

Web Title: #FamilyPlanning new concept women