पुणे : 'न्यू इअर सेलिब्रेशन'साठी सिंहगडला जायचंय? मग हे वाचाच!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती

खडकवासला : सिंहगड घाटातील दरडी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरू असल्याने यंदा नववर्षाचे स्वागत सिंहगडावर घाट रस्त्याने जाता येणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 'सकाळ'शी बोलताना दिली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंहगड घाटातील घाट रस्त्यावर पावसाळ्यात अनेक वेळा दरडी पडण्याचे प्रकार घडत असतात. हजारो पर्यटक गडावर जात असतात. मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर जाळ्या बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, पावसाळ्यात जाळ्या बसविण्याचे काम काही प्रमाणात झाले होते. उर्वरीत काम डिसेंबरमध्ये सुरू करायचे होते. यासाठी घाट रस्ता बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार, जाळ्या बसवण्याचे काम सुरू असल्याने एक जानेवारीपर्यंत घाट रस्ता बंद ठेवला जाणार आहे. 

मायवतींच्या एका निर्णयाने काँग्रेसची पंचाईत; सरकार धोक्यात

याबाबत, बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जयंत काकडे यांनी सांगितले की, सध्या घाट रस्त्यात जाळ्या बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसात काम पूर्ण होईल. त्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे या कामाची पाहणी करतील. काम पूर्ण झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर घाटरस्ता सुरू करण्याची प्रक्रिया होईल. 

Image result for sinhagad

दरम्यान, घाट रस्ता येथील दीड किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्याप रखडलेले आहे. डांबरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. याबाबत माहिती घेतली असता, सध्या डांबर मिळत नसल्याने काम रखडल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, डांबर उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fancing work are Started in sinhagad Ghat Road