परभणी: 'डिडीआर'च्या कक्षात तूर फेकून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नाफेडच्या तूर खरेदीची मुदत मंगळवारी (ता.१५) संपत असताना १३ हजार क्विंटल तुरीची खरेदी शिल्लक आहे. आतापर्यंत नाममात्र चार हजार क्विंटल तूर खरेदी झाल्याचा निषेध तूर सांडून केला. स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. 

परभणी : शहरातील जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयातील कक्षात सोमवारी (ता.१४) दुपारी दोन वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर फेकून आंदोलन केले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणा देवून तूर खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली. 

नाफेडच्या तूर खरेदीची मुदत मंगळवारी (ता.१५) संपत असताना १३ हजार क्विंटल तुरीची खरेदी शिल्लक आहे. आतापर्यंत नाममात्र चार हजार क्विंटल तूर खरेदी झाल्याचा निषेध तूर सांडून केला. स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. 

Web Title: farmer agitation in Parbhani