‘सी-व्हिजिल’ ॲपद्वारे १७४ तक्रारी

c-vigil-app
c-vigil-app

पुणे - निवडणूक आयोगाने मतदारांना तक्रार नोंदविण्यासाठी सी-व्हिजिल (cVIGIL) ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत सी-व्हिजिल ॲपद्वारे एकूण १७४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, या सर्व तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.

कोणताही अनुचित प्रसंग अथवा गुन्हा घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांना त्याची माहिती सी-व्हिजिल  ॲपद्वारे निवडणूक यंत्रणेला कळविता येते. प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करता करते. कोणी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करीत असेल, खोट्या बातम्या पसरवित असेल, धाकदपटशा, धार्मिक द्वेषयुक्‍त भाषण, मतदारांना पैशांचे वितरण, मद्य, अमली पदार्थांचे वितरण, शस्त्रांचे अवैध प्रदर्शन, पेड न्यूज, वस्तूंचे मोफत वितरण आणि विनामूल्य वाहतूक सेवा करणाऱ्या व्यक्‍तींच्याविरोधात नागरिकांना तक्रार करता येते. या तक्रारींनुसार नंतर कारवाई करण्यात येते. 

दिव्यांग मतदारांसाठी ॲप 
दिव्यांग व्यक्‍तींना मोबाईलवर पीडब्लूडी (PWD) ॲपद्वारे दिव्यांग व्यक्‍ती म्हणून नोंद करता येईल. मतदानासाठी व्हीलचेअरची मागणी करू शकतात. दिव्यांग व्यक्‍तींना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती ॲपवर देण्यात येणार आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिकांकडून बहुतांश तक्रारी बेकायदा पोस्टर, बॅनरबाबत आहेत. त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. आंबेगाव आणि शिरुर येथे विनापरवाना पोस्टर आणि उपोषण केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
- सुरेश जाधव, उपजिल्हाधिकारी (एसआरए), सी-व्हिजिल कक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com