पोटचारी काढून कालव्याच्या पाण्याची नदीकाठच्या शेतकऱ्यांची मागणी

राजकुमार थोरात 
सोमवार, 21 मे 2018

चालू वर्षी इंदापूर तालुक्यातील नीरा नदी फेब्रुवारी महिन्यामध्येच कोरडी पडली असल्यामुळे नदीकाठचे शेतकरी अडचणीमध्ये आले आहेत. 
तालुक्याच्या पश्‍चिम भागातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी परीसरातील नदीला पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेली पिके शेवटच्या टप्यामध्ये जळण्याच्या मार्गावरती आहेत. नदी काठच्या शेतकरी यावर्षी संकटात सापडले असून नदीला पाणी नाही व कालव्याचे पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी नदीपर्यत कालव्याच्या पोटचारी नसल्यामुळे पाणी जाण्यास अडचण होत आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कालव्याच्या पोटचारी नसल्यामुळे कालव्याचे पाणी पोचत नसून पाटबंधारे विभागाने पोटचारी काढून कालव्याचे पाणी देण्याची मागणी नदीकाठचे शेतकरी करु लागले आहेत. 

चालू वर्षी इंदापूर तालुक्यातील नीरा नदी फेब्रुवारी महिन्यामध्येच कोरडी पडली असल्यामुळे नदीकाठचे शेतकरी अडचणीमध्ये आले आहेत. 
तालुक्याच्या पश्‍चिम भागातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी परीसरातील नदीला पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेली पिके शेवटच्या टप्यामध्ये जळण्याच्या मार्गावरती आहेत. नदी काठच्या शेतकरी यावर्षी संकटात सापडले असून नदीला पाणी नाही व कालव्याचे पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी नदीपर्यत कालव्याच्या पोटचारी नसल्यामुळे पाणी जाण्यास अडचण होत आहे.

नीरा डाव्या कालव्याच्या उन्हाळी हंगामाच्या दुसऱ्या आवर्तनाला  दोन-तीन दिवसानंतर सुरवात होणार आहे. चालू वर्षी धरणामध्ये मुबलक पाणी साठा असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून कालव्याच्या पोटचारी काढण्यास मदत केल्यास निश्‍चित नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास मदत होणार असून जळण्याच्या मार्गावरती असणारी पिके वाचण्यास मोलाची मदत होणार असल्याने पाटबंधारे विभागाने पाणी देण्याची मागणी शेतकरी करु लागले आहेत. 
नीरा नदीमध्ये धरणातुन पाणी सोडावे यासाठी इंदापूर, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये आठ दिवस उपोषण करुन रास्तारोको, काळ्या गुढ्या उभारणे, सामुहिक मुंडन करणे अशी विविध प्रकारची आंदोलने केली होती. मात्र प्रशासनाने पाणी सोडण्यास नकार दिला होता. पाटबंधारे विभागाने किमान पोटचाऱ्यांची सोय करुन पाणी देण्याची मागणी शेतकरी करु लागले आहेत. 

Web Title: farmer demand of canal water