जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉलवर शेतकरी कुटुंबाने फोडला अश्रूंचा बांध 

निलेश बोरुडे
Friday, 16 October 2020

"हे बघा ना साहेब काहीच राहीलं नाही. चांगलं पिक आलं होतं. एवढाच आधार होता. सोसायटीचं कर्ज काढून गेल्यावर्षी वाहून गेलेलं शेत नीट करुन घेतलं होतं. आम्ही दोघं आणि आमची चार लेकरं लय राबलो होतो. बघा ना सगळं वाहून गेलं," असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सांगताना सणसनगर (ता. हवेली) येथील शेतकरी राहुल कोंढाळकर आणि त्यांची पत्नी अरुणा कोंढाळकर यांच्या डोळ्यांतून अश्रू आेघळत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सणसनगर येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.

किरकटवाडी (पुणे) :"हे बघा ना साहेब काहीच राहीलं नाही. चांगलं पिक आलं होतं. एवढाच आधार होता. सोसायटीचं कर्ज काढून गेल्यावर्षी वाहून गेलेलं शेत नीट करुन घेतलं होतं. आम्ही दोघं आणि आमची चार लेकरं लय राबलो होतो. बघा ना सगळं वाहून गेलं," असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सांगताना सणसनगर (ता. हवेली) येथील शेतकरी राहुल कोंढाळकर आणि त्यांची पत्नी अरुणा कोंढाळकर यांच्या डोळ्यांतून अश्रू आेघळत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सणसनगर येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​

सणसनगर येथील अनेक शेतकऱ्यांची भातशेती अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. गेल्यावर्षी 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये असेच नुकसान झाले होते. तेव्हाची मदत अजून मिळाली नाही, असेही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉलवर सांगितले. राहुल कोंढाळकर या शेतकऱ्यावर दोन वर्षांपासून शेतीच्या नुकसानीमुळे गंभीर परिस्थिती ओढवली आहे. वाहून गेलेले शेत दुरुस्त करण्यासाठीच एक लाखापेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. मशागत, बियाणे यावरील खर्च तर वेगळाच. अस्मानी संकट आणि प्रशासनाची अनास्था अशा दुहेरी संकटामुळे राहुल कोंढाळकर या शेतकऱ्यांचे कुटुंब अडचणीत सापडले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी राहुल कोंढाळकर यांच्यासह, यशवंत कोंढाळकर, आबेश कोंढाळकर, अनिल कोंढाळकर या शेतकऱ्यांशीही व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी आपुलकीने विचारपूस केल्याने व मदतीबाबत विश्र्वास दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार! 

 

"सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीची मदत शासनाकडून अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाही. हवेली तालुक्यातील शेतीच्या नुकसान भरपाईची जवळपास 3 कोटी रक्कम शासनाकडून आलेली नाही. मी याबाबत स्वत: पाठपुरावा करून मागील वर्षीची व आत्ताची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मी समजू शकतो. प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये."

-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer family interacted with the Collector on video call