पालखी मार्गावरील पंचनाम्यास अखेर शेतकऱ्यांनी दिली परवानगी

विजय मोरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

बारामती-पाटस संत तुकाराम महाराज या प्रस्तावित महामार्गाची मोजणी पूर्ण झाली असून हद्दीही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. सध्या रस्त्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या इमारती, विहिरी, पाइपलाईनचे व झाडांचे पंचानामे करण्याचे काम सुरु असताना शेतकऱ्यांनी मागील पाच - सहा दिवसात पंचनाम्याचे काम बंद पाडले होते.

उंडवडी : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील पंचनामा करण्याच्या कामाला अखेर प्रांतअधिकारी हेमंत निकम यांच्या मध्यस्तीनंतर आज खराडेवाडी व उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांनी मान्यता दिली. 

बारामती-पाटस संत तुकाराम महाराज या प्रस्तावित महामार्गाची मोजणी पूर्ण झाली असून हद्दीही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. सध्या रस्त्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या इमारती, विहिरी, पाइपलाईनचे व झाडांचे पंचानामे करण्याचे काम सुरु असताना शेतकऱ्यांनी मागील पाच - सहा दिवसात पंचनाम्याचे काम बंद पाडले होते. 

या पार्श्वभूमीवर आज (ता. 28) मंगळवारी उंडवडी सुपे येथे बारामतीचे प्रांतअधिकारी हेमंत निकम यांनी संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेतली. 

यावेळी झालेल्या बैठकीत प्रांतअधिकारी निकम म्हणाले, "जोपर्यंत रस्त्यात जात असलेली घरे, दुकाने, जागा, विहीर, पाईपलाईन, बोअरवेल्स व फळबागा याचे पंचनामे होत नाहीत. तोपर्यंत कोणाचे काय जात हे समजणार नाही. प्रत्येकाचे दर वेगवेगळे असून पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पंचनाम्यास सहकार्य करा. जोपर्यंत पंचनामे होत नाहीत.  तो पर्यंत दर निश्चित ठरवता येत नाही. 

प्रत्यक्षात पंचनामे होतील, तेव्हाच दर ठरेल. त्या अगोदर कसा दर देणार असा सवाल शेतकऱ्यांना प्रांत अधिकारी निकम यांनी शेतकऱ्यांना केला.  प्रांतअधिकारी निकम पुढे म्हणाले, ''रस्त्याचे काम सुरु होण्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. 2013 च्या शासन निर्णयानुसार 'रेडी रेकनर' च्या चारपट मोबदला शेतकऱ्यांना मिळणार दिला जाईल. चार - पाच दिवसात संबंधीत अधिकारी पंचनाम्यासाठी येतील, त्यांना सहकार्य करावे. " 

यावेळी प्रांत अधिकारी निकम यांच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत पंचनाम्यास आम्ही सहकार्य करु असे सांगितले. यावेळी सुपेचे मंडलअधिकारी राहुल जगताप, खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रेय खराडे, उंडवडी सुपेचे उपसरपंच पोपट गवळी, गावकामगार तलाठी एस. एल. इंगुले, दिपक साठे आदींसह खराडेवाडी व उंडवडी सुपे येथील शेतकरी उपस्थित होते. 

 

Web Title: The farmer finally gave permission for Panchnama on the Palkhi route